दीपक पाऊणकर भाजप सोशल मीडिया सेलच्या जिल्हा संयोजकपदी

गेल्या 12 वर्षांपासून पक्षात सक्रिय, सामाजिक कार्यातही पुढाकार

पुरुषोत्तम नवघरे, वणी: भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) यवतमाळ जिल्हा संघटनेत दीपक शंकरराव पाऊणकर यांची सोशल मीडिया जिल्हा संयोजकपदी निवड झाली आहे. गेल्या 12 वर्षांपासून पक्षात सक्रिय असलेले पाऊणकर यांनी विविध पदांवर काम करत संघटन मजबूत केले आहे. 2013 पासून राजकारणात कार्यरत असलेले पाऊणकर यांनी विद्यार्थी आघाडी शहराध्यक्ष, सोशल मीडिया तालुका संयोजक आणि विधानसभा संयोजक अशा महत्त्वाच्या जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या. त्यांच्या कार्यक्षमतेच्या जोरावर पक्षाने त्यांना जिल्हा संयोजकपदाची जबाबदारी दिली.

पक्ष कार्याबरोबरच त्यांनी शिवजन्मोत्सव युवा मित्र मंडळ, छत्रपती ढोल ताशा पथक, नृसिंह स्पोर्टिंग क्लब आणि एकता तेली समाज वणी या संस्थांमधून युवकांना एकत्र करून सामाजिक, सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रात योगदान दिले आहे. पाऊणकर यांच्या निवडीवर स्थानिक कार्यकर्ते, संघटना आणि नागरिकांनी अभिनंदन करत पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Comments are closed.