पुरुषोत्तम नवघरे, वणी : आगामी नवरात्री आणि दुर्गा उत्सव शांततेत व पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यासाठी वणी पोलिस स्टेशनमध्ये शनिवारी दुर्गा उत्सव मंडळांचे अध्यक्ष, सदस्य तसेच प्रतिष्ठित नागरिकांची बैठक घेण्यात आली. ही बैठक पोलीस निरीक्षक गोपाल उंबरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी 11 ते दुपारी 12.30 वाजेपर्यंत पार पडली. स्थापना व विसर्जनाच्या दिवशी डीजे टाळण्याचे आवाहन ठाणेदार यांनी केले.
बैठकीत दुर्गा विसर्जन मिरवणूक पारंपरिक पद्धतीनेच काढावी, डीजेचा वापर टाळून पारंपरिक वाद्यांना प्राधान्य द्यावे, मिरवणुकीत मंडळाचे स्वयंसेवक मोठ्या संख्येने सहभागी व्हावेत, नशा किंवा मद्यपान करून कोणीही मिरवणुकीत सहभागी होता कामा नये, ठरवलेल्या मार्ग व वेळेचे काटेकोर पालन करावे, विसर्जन घाटावर शिस्त राखावी, नवरात्रीदरम्यान प्रत्येक मंडपात किमान एक स्वयंसेवक पूर्णवेळ उपस्थित असावा आणि कोणत्याही मंडळाने आक्षेपार्ह पोस्टर किंवा बॅनर लावू नयेत अशा सूचना देण्यात आल्या.

मान्यवरांनी आवाहन केले की, नागरिकांनी पोलिस प्रशासनाला सहकार्य करून उत्सव शांततेत पार पाडावा. बैठकीत सर्व मंडळांनी डीजेमुक्त मिरवणुका काढून शांततेत विसर्जन करण्याचे ठरवले. या बैठकीला सुमारे 150 ते 175 अध्यक्ष, सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते.





Comments are closed.