भद्रकाली मातेची अखंड ज्योत नवरात्र महोत्सवात वणीत

यंदा कुरुक्षेत्र येथून येणार अखंड ज्योत

पुरुषोत्तम नवघरे, वणी : यावर्षी नवरात्र महोत्सवात आंबेडकर चौकातील नवशक्ती दुर्गा माता मंदिरात 51 जागृत शक्तिपीठांपैकी हरियाणा राज्यातील कुरुक्षेत्र येथील माँ भद्रकाली मातेची अखंड ज्योत प्रज्वलित करून वणी नगरीत आणण्यात येणार आहे, अशी माहिती मंदिर समितीचे अध्यक्ष रवी बेलूरकर यांनी दिली.

ही अखंड ज्योत घटस्थापनेच्या दिवशी म्हणजेच 22 सप्टेंबर रोजी वणी येथे आणली जाणार असून, दरवर्षीप्रमाणे यंदाही एका शक्तिपीठातून मातेची ज्योत आणण्याची परंपरा सुरू राहणार आहे. पहिल्या वर्षी माहूर येथील रेणुका मातेची तर दुसऱ्या वर्षी तुळजापूर येथील तुळजाभवानी मातेची अखंड ज्योत वणीत आणली होती.

यावर्षी कुरुक्षेत्र येथून प्रज्वलित करण्यात आलेली ही अखंड ज्योत आंबेडकर चौकातील दुर्गा माता मंदिरात भाविकांच्या दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. नवरात्रीच्या 9 दिवसांत विविध धार्मिक कार्यक्रमांनी उत्सव साजरा करण्यात येणार असून, भाविकांनी मोठ्या संख्येने या अखंड ज्योतीचे दर्शन घ्यावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

मंदिर समितीचे अध्यक्ष रवी बेलूरकर यांच्यासह दौलत वाघमारे, प्रमोद लोणारे, शिवा आसुटकर, पुरुषोत्तम मांदाडे, अमोल बदखल, स्वप्निल बिहारी, राजकुमार अमरवानी, विलास डवरे, सतीश कामटकर, नितीन मसेवार, धम्मा मनवर, अशोक मांदाडे, संजय लोणारे, विनोद मुथा, चंद्रकांत फेरवानी, राजू जयस्वाल, समीर लाभसेटवार आदी पदाधिकारी व कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत.

Comments are closed.