वणी नगर परिषदेत “लोक कल्याण मेळावा” सुरू

फेरीवाल्यांना PM स्वनिधी योजनेतून कर्ज वितरणासह विविध योजनांचा थेट लाभ

पुरुषोत्तम नवघरे, वणी :  नगर परिषद वणीच्या वतीने १८ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर २०२५ दरम्यान “लोक कल्याण मेळावा” चे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याचा उद्देश फेरीवाले व शहरी गरीब घटकांना विविध शासकीय योजनांचा थेट लाभ देणे हा आहे. विशेषत: प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी (PM SVANidhi) योजनेअंतर्गत खेळते भांडवल कर्ज वितरणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

मुख्याधिकारी तथा प्रशासक सचिन गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली व उपमुख्याधिकारी जयंत सोनटक्के यांच्या प्रयत्नातून हा उपक्रम सुरू झाला आहे. PM स्वनिधी योजनेत पहिल्या टप्प्यात ₹15,000, दुसऱ्या टप्प्यात ₹25,000 तर तिसऱ्या टप्प्यात ₹50,000 इतके कर्ज दिले जाणार आहे. वेळेवर कर्जफेड करणाऱ्यांना 7% व्याज सवलत व डिजिटल व्यवहार करणाऱ्यांना मासिक कॅशबॅकची सुविधा मिळणार आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

मेळाव्यात पीएम स्वनिधी योजनेसाठी नवीन अर्ज स्वीकृती, मंजूर अर्जांचे कर्ज वितरण, बँक प्रकरणांचा निपटारा, “स्वनिधी से समृद्धी” अंतर्गत विमा व निवृत्तीवेतन योजनांचे मार्गदर्शन, इमारत व बांधकाम नोंदणी, जननी सुरक्षा योजना तसेच वन नेशन वन रेशन योजनेची माहिती उपलब्ध करून देण्यात आली.

मेळाव्याचे स्थळ कार्यालय नगर परिषद वणी व शहर उपजीविका केंद्र (वॉटर वर्क्स, शिवाजी गार्डन जवळ) येथे निश्चित करण्यात आले आहे. या उपक्रमासाठी DAY-NULM विभाग प्रमुख पौर्णिमा शिरभाते, उत्तम हापसे, विनोद मनवर, प्रिया मेश्राम, क्रांतीज्योती शहरस्तर संघ तसेच सर्व CRP यांनी विशेष परिश्रम घेतले.

“लोक कल्याण मेळावा” मुळे फेरीवाले व शहरी गरीब घटकांना थेट शासकीय योजनांचा लाभ मिळून त्यांच्या आर्थिक सबलीकरणाला चालना मिळेल, असा विश्वास नगर परिषद प्रशासनाने व्यक्त केला आहे.

Comments are closed.