पुरुषोत्तम नवघरे, वणी : राजर्षी शाहू महाराज हिंदी विद्यालय, वणी येथे हिंदी दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या शिल्पकला व रांगोळी कलाकृतींच्या परिक्षणाने झाली.
समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून औद्योगिक प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य अतुल राजगडकर उपस्थित होते, तर विद्यालयाचे मुख्याध्यापक अभय पारखी अध्यक्षस्थानी होते. या प्रसंगी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन तसेच अनेक स्पर्धा घेण्यात आल्या. विशेष म्हणजे हा उपक्रम सात दिवस चालला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक गंगारेड्डी बोडखे यांनी केले, सूत्रसंचालन अनिता टोंगे यांनी तर आभारप्रदर्शन प्रभुदास नगराळे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भाग्यश्री लांडे, प्रतिश लखमापुरे, तुषार घाणे, सुनील गेडाम, राजेंद्र देवतळे, हरिदास बोढाले, हरीष वासेकर व जितेंद्र डगावकर यांनी परिश्रम घेतले.





Comments are closed.