अजातशत्रू कार्यकर्त्याचा अंत; राजाभाऊ पाथ्रडकर यांचे निधन

सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय क्षेत्रात मोलाचे योगदान

बहुगुणी डेस्क, वणी: वणीतील सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रात कार्यरत असलेले समाजसेवक व काँग्रेसचे खंदे समर्थक राजाभाऊ पाथ्रडकर यांचे आज दुपारी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर संध्याकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार असून, राम शेवाळकर परिसर येथील त्यांच्या राहत्या घरून संध्याकाळी 6 वाजता अंत्ययात्रा निघणार आहे. राजाभाऊ पाथ्रडकर यांची ओळख अजातशत्रू म्हणून होती. त्यांच्या निधनाने शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

शहरातील सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांमध्ये त्यांचा सक्रीय सहभाग असायचा. नवरात्रोत्सवानिमित्त जैताई मंदिरात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी सेवा देण्यासाठी मंदिरात गेले असताना त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. तातडीने एका खासगी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

राजाभाऊ पाथ्रडकर यांनी राजकारणासोबतच विविध संस्थांमध्येही महत्त्वाची पदे भूषवली. ते लॉयन्स क्लबचे अध्यक्ष होते तसेच अनेक सहकारी संस्थांवरही त्यांनी पदभार सांभाळला होता. त्यांच्या निधनाची बातमी समजताच सोशल मीडियाद्वारे विविध मान्यवरांनी शोक व्यक्त केला.

Comments are closed.