भाजपच्या तिकीटसाठी इच्छुक उमेदवारांना करावा लागणार अर्ज
भाजपची नगरपालिकेची तयारी सुरू, आजपासून अर्ज वाटप सुरू
बहुगुणी डेस्क, वणी: येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी (भाजप) ने कामाला लगेच सुरुवात केली असून, शहर अध्यक्ष एड. निलेश माया महादेव चौधरी यांनी सर्व प्रभागांमध्ये मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रभाग प्रभारी आणि प्रभाग सहप्रभारी यांची नियुक्ती केली आहे. नुकत्याच झालेल्या नियोजन बैठकीत पक्षाने निवडणूक रणनीती आखली असून, १०० महिला आणि २५ पुरुषांसह एकूण १२५ नवीन सदस्यांचा पक्षप्रवेश झाला. बैठकीला माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
दिनांक १८ ऑक्टोबर रोजी वसंत जिनिंग, वणी येथे दुपारी सहा वाजता झालेल्या विचारसभेत आणि नियोजन बैठकीत या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. यावेळी उपस्थित मान्यवरांनी नव्याने सामील झालेल्या सदस्यांना पक्षाचा शेला देऊन. पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
निवडणूक जनतेच्या सेवेसाठी – अॅड निलेश चौधरी
निवडणूक ही केवळ जागा जिंकण्याची नाही, तर जनतेच्या सेवेसाठीची जबाबदारी आहे. आम्ही प्रत्येक प्रभागात मजबूत संघटना उभारत आहोत आणि प्रत्येक मतदाराच्या दारात पोहोचण्यासाठी कार्यकर्त्यांना सक्षम करू. वणीच्या विकासासाठी भाजपची वचनबद्धता अटळ आहे.

आजपासून इच्छुकांना घेता येणार अर्ज
मान्यवरांनी उपस्थित कार्यकर्त्यांना निवडणूक रणनीतीबाबत मार्गदर्शन करून सर्वांना तात्काळ कामाला लागण्याचे आवाहन केले. विशेषतः, दिनांक १९ ऑक्टोबर ते २३ ऑक्टोबर या कालावधीत नगरसेवक आणि नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक व्यक्तींनी पक्षाकडून उपलब्ध अर्ज मिळवून आवश्यक कागदपत्रांसह मुदतीत भरून द्यावेत, अशी सूचना देण्यात आली. या बैठकीमुळे भाजपची वणीतील संघटना आणखी बळकट झाली असून, निवडणुकीसाठी उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे.
या बैठकीला माजी जिल्हा अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे, राज्य परिषद सदस्य तथा वरिष्ठ नेते दिनकर पावडे, माजी जिल्हा परिषद सदस्य व यवतमाळ जिल्हा कामगार आघाडी अध्यक्ष विजय पिदुरकर, माजी पंचायत समिती सभापती व यवतमाळ जिल्हा उपाध्यक्ष संजय पिंपळशेंडे, जिल्हा उपाध्यक्ष रवी बेलुरकर, कुणाल चोरडिया, जिल्हा सचिव श्री. संतोष डंभारे, माजी नगरपरिषद उपाध्यक्ष श्रीकांत प्रभाकर पोटदुखे, महादेव खाडे, ओबीसी मोर्चा अध्यक्ष पवन राम एकरे, सोशल मीडिया अध्यक्ष दीपक शंकरराव पाऊणकर, शहर मंडळाचे सर्व पदाधिकारी व सदस्य, शक्ती केंद्र प्रमुख, बूथ प्रमुख, बूथ समिती सदस्य तसेच आघाड्या, सेल, प्रकोष्ठ आणि युवा मोर्चाचे प्रमुख व पदाधिकारी उपस्थित होते. एकूण जवळपास ३५० कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.



Comments are closed.