अवघ्या 24 तासांत हरवलेल्या मोबाईलचा पोलिसांनी घेतला शोध

पोलिसांची वेगवान कारवाई ! तरुणाला मोबाईल केला परत

बहुगुणी डेस्क, वणी: वणी पोलिसांनी पुन्हा एकदा तत्परता आणि तांत्रिक कौशल्य दाखवत हरवलेला मोबाईल अवघ्या 24 तासांत शोधून काढला आहे. मोबाईल हरवल्याची तक्रार नोंदताच केवळ एका दिवसात मोबाईल शोधून फिर्यादीला परत मिळवून देत पोलिसांनी चोख कामगिरी बजावली आहे. या वेगवान कारवाईमुळे वणी पोलिसांचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

फिर्यादी मारोती विजय नवले (29) हा पिंपरी (कायर) येथील रहिवासी आहे. त्याच्याकडे ओप्पो कंपनीचा मोबाईल आहे. सदर मोबाईल हरवल्याची त्याने याबाबत वणी पोलीस ठाण्यात सोमवारी दिनांक 3 नोव्हेंबर रोजी तक्रार नोंदवली होती. तक्रार दाखल होताच वणी पोलीस कामाला लागले. खबरी ऍक्टिव्ह केले. तांत्रिक तपासाची मदत घेतली. त्यानंतर अवघ्या 24 तासाच्या आता पोलिसांना मोबाईलचे लोकेशन मिळाले.

पोलिसांनी सदर मोबाईल ताब्यात घेत फिर्यादी यांना परत केला. अवघ्या 24 तासांच्या आता पोलिसांनी मोबाईल गहाळ झाल्याचा प्रकरणाचा छडा लावल्याने वणी पोलिसांचे कौतुक होत आहे. शहरात मोबाईल चोरट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे मोबाईल सांभाळून ठेवावे. तसेच कुणी संशयास्पद व्यक्ती आसपास आढळल्यास याची माहिती पोलिसांना द्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. सदर कारवाई ठाणेदार गोपाळ उंबरकर यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.

Comments are closed.