वणीतील टागौर चौक परिसरातील बंद बोअरवेल अखेर सुरु
मनसे शहराध्यक्ष अंकुश बोढे यांच्या पाठपुराव्याला यश
बहुगुणी डेस्क, वणी: वणी शहरातील टागौर चौक परिसरात अनेक दिवसांपासून बंद अवस्थेत असलेली नगरपरिषदची बोअरवेल अखेर सुरु झाली आहे. या बोअरवेलमुळे परिसरातील नागरिकांना पाणीपुरवठ्याबाबत दिलासा मिळणार आहे. मनसेचे शहराध्यक्ष अंकुश बोढे यांनी या संदर्भात सातत्याने पाठपुरावा केला होता. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले असून बोअरवेलची दुरुस्ती पूर्ण झाली आहे.
टागोर चौकातील स्नेहा स्वीट डेअरी जवळील ही बोअरवेल बंद असल्याने परिसरातील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता. विशेषतः रंगारी पुरा, अण्णाभाऊ साठे चौक परिसरातील नागरिकांना पाणीपुरवठ्याबाबत मोठ्या अडचणी येत होत्या. या समस्येवर उपाययोजना करण्यासाठी अंकुश बोढे यांनी निवेदन देत नगरपरिषद प्रशासनाशी सातत्याने संपर्क साधला. अखेर त्यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले आणि आज कामाला सुरूवात झाली. दुपारी बोअरवेल सुरु करण्यात आली.

नागरिकांनी या कामाबद्दल समाधान व्यक्त करत बोढे यांचे आभार मानले आहेत. “अनेक दिवसांपासून बोअर बंद असल्याने नागरिकांना पाणी मिळण्यात अडचणी येत होत्या. आता बोअर सुरु झाल्याने नागरिकांना दिलासा मिळेल. जनतेच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करून त्यांचे निराकरण करणे हेच माझे ध्येय आहे,” अशी प्रतिक्रिया अंकुश बोढे यांनी दिली.





Comments are closed.