आशिष खुलसंगे यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव पारीत

13 विरुद्ध 1 मताने अविश्वास प्रस्ताव पारीत

बहुगुणी डेस्क, वणी: वसंत जिनिंग ऍन्ड प्रेसिंगचे अध्यक्ष आशिष खुलसंगे यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव पारीत पारीत करण्यात आला. आज याबाबत वसंत जिनिंग येथे विशेष सभा पार पडली. या सभेत 13 विरुद्ध 1 मतांनी हा प्रस्ताव पारित करण्यात आला. हा आशिष खुलसंगे यांना मोठा धक्का मानला जात आहे.

एकाधिकार, कामात अपारदर्शकता इत्यादी आरोप करीत गेल्या काही काळापासून आशिष खुलसंगे यांच्याविरोधात अविश्वास प्रस्तावाची टांगती तलवार होती. दिड वर्षांआधी लोकसभा निवडणुकीच्या काळात अविश्वास प्रस्तावासाठी हालचाली सुरु झाल्या होत्या. मात्र वरीष्ठांनी यात हस्तक्षेप केला. त्यानंतर हा वाद थांबवण्यात आला. त्यानंतर आता पुन्हा अविश्वास प्रस्तावासाठी संचालकांनी हालचाली सुरु केल्या.

3 नोव्हेंबर रोजी वसंत जिनिंगच्या 13 संचालकांनी आशिष खुलसंगे यांच्या विरोधात जात उपनिबंधकांना अविश्वासाबाबत पत्र दिले होते. त्यावर जिल्हा उपनिबंधक यांनी महाराष्ट्र सहाकारी संस्था अधिनियम 1960 च्या  कलम  73 (1) (3) अन्वये आदेश जारी केला होता. त्यानुसार दिनांक 12 नोव्हेंबर रोजी दु. 1 वाजता वसंत जिनिंगच्या सभागृहात विशेष सभा भरवण्यात आली होती. यात अविश्वास प्रस्तावावर मतदान घेण्यात आले. यावर 13 विरुद्ध 1 मतांनी हा प्रस्ताव पारीत झाला.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

वसंत जिनिंग ऍन्ड प्रेसिंग या सहकारी संस्थेत 17 संचालकांची बॉडी आहे. यात 14 जणांनी मतदान केले तर तीन सदस्य गैरहजर होते. आशिष खुलसंगे यांच्या वाटेला केवळ त्यांचे एक मत प्राप्त झाले. हा आशिष खुलसंगे यांना मोठा धक्का मानला जात आहे. 

एक महत्त्वाची सहकारी संस्था म्हणून वसंत जिनिंगची परिसरात ओळख आहे.  वसंत जिनिंग संस्थेच्या वणी, मारेगाव, मुकूटबन, शिंदोला व मार्डी अशा 5 ठिकाणी जिनिंग प्रेसिंग फॅक्टरी आहे. तसेच वणी, कायर, शिंदोला, घोंसा, मारेगाव, मार्डी, मुकूटबन या 7 ठिकाणी संस्थेचे कृषी केंद्र कार्यरत आहे. याशिवाय वणी येथे शेतकरी मंदिर सभागृह, वसंत जिनिंग हॉल व लॉन तर मारेगाव येथे मंगल कार्यालय आहेत. हे सध्या संस्थेचे उत्पन्नाचे स्रोत आहेत. तर आज संस्थेचे सुमारे 11 हजार सभासद आहेत.

 

Comments are closed.