बहुगुणी डेस्क, वणी: तालुक्यातील इजासन (गाडेगाव) येथे एका महिलेने विषारी द्रव्य प्राषन करून आत्महत्या केली. 17 नोव्हेंबर रोजी रात्री 10 वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. संगिता विठ्ठल निळे (वय 55) असे मृत महिलेचे नाव आहे. संगिता या कुटुंबासह इजासन येथे राहत होत्या. घरी कुणी नसताना राहत्या घरी त्यांनी विषारी द्रव्य प्राशन केले. ही बाब लक्षात येताच कुटुंबीयांनी तिला तातडीने ग्रामीण रुग्णालयात हलविले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मृतदेहाचे शवविच्छेदन करून अंतिम संस्कारासाठी कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आला. प्रकरणाचा तपास पोलीस करीत आहे. आधी मारेगाव तालुक्यात सातत्याने आत्महत्या सुरु होत्या. आता वणी तालुक्यात देखील सततच्या आत्महत्येच्या घटना समोर येत आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. (इमेज एआय जनरेटेड)
निकेश जिलठे - संपादक वणी बहुगुणी
2007 पासूून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. ग्रामीण व शहरी असा पत्रकारितेचा अनुभव. आजतक, झी, जय महाराष्ट्र, टीव्ही 9 इत्यादी आघाडीच्या टीव्ही मीडियात मुंबई येथे विविध पदावर 10 वर्ष कार्यरत. सध्या एका पीआर एजन्सीचे संचालक तसेच वणी बहुगुणी या वेबसाईटचे मुख्य संपादक. यवतमाळ जिल्ह्यातील पहिले न्यूज पोर्टल वणी बहुगुणी या स्थानिक न्यूज पोर्टलच्या माध्यमातून परिसरातील ज्येष्ठ व नव्या दमाच्या पत्रकारांसह वणी व परिसरातील बातम्या व ताज्या घडामोडी पोहोचवण्याचा एक प्रयत्न. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक विषयावर विविध माध्यमात लिखाण. राज्यातील अनेक ज्येष्ठ नेते व मंत्री यांचे मीडिया कन्सलटन्ट म्हणूनही कार्य.

Comments are closed.