सौ. मंजुषा मंगेश झाडे: प्रभागाचा कायापालट करणारी नगरसेविका पुन्हा रिंगणात

वणीतील पहिला बगिचा ते इतर विकास कामं.... यंदा उर्वरित कामे पूर्ण करण्याचा निर्धार

बहुगुणी डेस्क, वणी: वणी नगर परिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक 2 (अ) मधून शिवसेना (शिंदे गट) तर्फे माजी नगरसेविका सौ. मंजुषा मंगेश झाडे या उमेदवारीच्या रिंगणात उतरल्या आहेत. लोकांच्या समस्या सातत्याने मांडणारी आणि त्यावर उपाययोजना करणारी एक नगरसेविका म्हणून त्यांची ओळख आहे. नगरसेविका असतानाच्या पाच वर्षांच्या काळात प्रभागाचा कायापालट करणारी नगरसेविका म्हणून त्यांची ओळख आहे.

सौ. मंजुषा झाडे यांचा परिचय
सौ. मंजुषा मंगेश झाडे या प्रगती नगर येथील रहिवासी असून त्या गृहिणी आहेत. त्यांनी बी.ए. पर्यंत शिक्षण घेतलेले आहे. 2016 च्या नगरपालिकेच्या निवडणुकीत त्या निवडून आल्या होत्या. 2016 ते 2021 या कालावधीत प्रभागात विविध विकासकामे करण्यासाठी त्या कायम प्रयत्नशील राहिल्या. यासह नगर पालिकेच्या आरोग्य सभापती म्हणूनही त्यांनी काम केले.

नगरसेविका असतानाचा कार्यकाळ
नगरसेविका असताना त्यांनी प्रगती नगर येथील पाण्याची टाकी सुरु करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. प्रगती नगर येथील पाण्याची टाकी सुरु झाल्याने प्रभागातील पाणी पुरवठा सुरळीत झाला. ठिकठिकाणी पाईप लाईनची व्यवस्था करण्यात आली. त्यामुळे जिथे पाण्याचा फोर्स कमी होता किंवा पाणी येत नव्हते, त्या भागातील समस्या मोठ्या प्रमाणात दूर झाल्या. त्यांच्या कार्यकाळातच वणी शहरातील पहिला बगिचा — शांती पार्क (ब्रह्माकुमारीज जवळ) सुरु झाला. आज ही बाग बाल गोपाळापासून ते वृद्धापर्यंत सर्वांना फिरण्याचे व बागडण्याचे एक हक्काचे ठिकाण झाले आहे.

यासह संपूर्ण प्रभागातील ड्रेनेज व्यवस्था ठिक करण्यात त्यांनी विशेष प्रयत्न केले. तसेच ज्या भागात रस्त्यांचा अभाव होता. अशा भागात रस्त्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला व रोड मंजूर करून घेतला. आज प्रगती नगर, ढुमे नगर व परिसरातील भागात सुसज्ज रोड दिसून येतात. यासह प्रभागात वॉटर एटीएम सुरु करण्यात पुढाकार घेतला. नागरिकांच्या आरोग्य व मूलभूत सुविधांच्या प्रश्नांवर त्यांनी सातत्याने आवाज उठवला. त्यांच्या कार्यकाळात आरोग्याशी संबंधित उपक्रमांना विशेष गती मिळाली.

भविष्यातील योजना
नगरसेविका असताना अधिकाधिक समस्या सोडवण्यावर त्यांचा भर होता. त्यातील अनेक मोठ्या समस्या त्यांच्या कार्यकाळात मार्गी निघाल्या. परंतु काही कामे अपूर्ण राहिली आहेत. यावेळी मतदारांनी संधी दिल्यास त्या उर्वरित कामे पूर्ण करण्याचा निर्धार त्या व्यक्त करतात. ज्या ठिकाणी पथदिवे नाहीत, तिथे पथदिवे लावण्याचा मानस आहे. ओपन स्पेसला विकसित करून नागरिकांसाठी बाग व खेळाची सुविधा उपलब्ध करून देण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. नवीन लेआऊटमध्ये मुलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देणे हा त्यांच्या अजेंड्यातील महत्त्वाचा मुद्दा आहे.

माजी आमदार विश्वास नांदेकर, शिवसेना जिल्हा संघटक विजय चोरडिया, विनोद मोहीतकर यांच्या मार्गदर्शनात शिवसेना (शिंदे गट) तर्फे प्रभाग क्रमांक 2 (अ) मधून सौ. मंजुषा मंगेश झाडे यांनी उमेदवारी दाखल केली आहे. त्यांची उमेदवारी ही लोकांच्या समस्या सोडवण्याचा सातत्याने प्रयत्न करणाऱ्या कार्यकर्तीची उमेदवारी आहे, असे प्रभागातील मतदार आवर्जून बोलतात. प्रभाग क्रमांक 2 मध्ये प्रगती नगर, ढुमे नगर, आवारी ले आऊट, फाले ले आऊट, भोंगळे ले आऊट, बजरंग नगर, जुना कॉटन मार्केट, पंचवटी अपार्टमेंट, जनता शाळेजवळील परिसर, गणेश गृह निर्माण सोसायटी व पट्टाचारा नगर येथील काही भागाचा समावेश होतो.

Comments are closed.