भाजपचा गृहभेट व कॉर्नर सभांचा धडाका – जनतेचा उत्स्फूर्त सहभाग
मा. आ. संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या नेतृत्त्वात जनतेशी थेट संवाद, जैन ले आऊटमध्ये बैठक
बहुगुणी डेस्क, वणी: नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वणी शहरात भाजपकडून गृहभेटी व कॉर्नर सभांचा जोरदार धडाका सुरू आहे. मा. आ. संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या नेतृत्त्वात नगरसेवक पदाचे सर्व उमेदवार तसेच नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विविध भागात जनतेशी थेट संवाद साधत आहेत. मंगळवारी जैताई मंदिरात दर्शन घेऊन गृहभेट व जनसंवाद मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. बुधवारी जैन ले आऊटसह प्रभाग 2 व प्रभाग 9 मधील काही भागांचा दौरा करण्यात आला. या दौऱ्यात ठिकठिकाणी मतदारांनी उमेदवारांचे स्वागत केले.
प्रत्येक प्रभागात विकासाची गंगा पोहोचवणार
जनतेच्या विश्वासानेच मी आजवर काम केले आहे. गृहभेटी व कॉर्नर सभा या केवळ प्रचारासाठी नसून, नागरिकांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी आहेत. काही वर्षांपूर्वी जैन ले आऊट हा भाग अविकसित म्हणून ओळखला जायचा. आज त्याचा कायापालट झाला आहे. वणीच्या प्रत्येक प्रभागात अशीच विकासाची गंगा वाहिली पाहिजे, हीच माझी धडपड आहे. जनतेच्या सहकार्याने आपण प्रत्येक प्रभागात बदल घडवू – मा. आ. संजीवरेड्डी बोदकुरवार

यावेळी भाजप शहराध्यक्ष ऍड. निलेश चौधरी, जिल्हा उपाध्यक्ष संजय पिंपळशेंडे, जिल्हा उपाध्यक्ष रवि बेलुरकर, माजी नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे, माजी उपाध्यक्ष श्रीकांत पोटदुखे, दिनकर पावडे, विजय पिदूरकर, अंकुश बोढे यांच्यासह नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार विद्या सचिन आत्राम तसेच सर्व प्रभागातील 29 उमेदवार व भाजप कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.



Comments are closed.