प्रभाग 11 मध्ये भाजपचा जनसंवाद दौरा, पिंजून काढला प्रभाग
रेखा कोवे व लवलेश लाल यांच्या प्रचार यात्रेला मतदारांचा भरभरून प्रतिसाद
बहुगुणी डेस्क, वणी: नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वणी शहरात भाजपकडून गृहभेटी व कॉर्नर सभांचा जोरदार धडाका सुरू आहे. गुरुवारी दिनांक 20 नोव्हेंबर रोजी मा. आ. संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या नेतृत्त्वात प्रभाग क्रमांक 11 चे भाजपचे अधिकृत उमेदवार रेखा विलासराव कोवे, लवलेश किसनलाल लाल व नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विद्या खेमराज आत्राम यांच्या प्रचारार्थ संपूर्ण प्रभाग पिंजून काढला. यावेळी गृहभेट आणि जनसंवाद दौरा काढत प्रभागातील वार्डातील जनतेशी थेट संवाद साधला. जनतेच्या स्वागताने प्रचारयात्रेला वेगळेच रूप लाभले. यावेळी प्रभाग 11 मधील गल्लीबोळ उत्साहाने उजळले होते.
प्रभाग क्रमांक 11 अ मध्ये रेखा विलासराव कोवे तर 11 ब मध्ये भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते लवलेश किसनलाल लाल हे भाजपचे अधिकृत उमेदवार आहे. सकाळी शहरातील मतदारांच्या बैठक घेतल्यानंतर मा. आ. संजय बोदकुरवार यांच्या नेतृत्त्वात दुपारी या उमेदवारांच्या प्रचार यात्रेला प्रारंभ झाला. संध्याकाळ पर्यंत ही जनसंवाद यात्रा सुरु होती. गृहभेट घेत यावेळी नागरिकांच्या समस्यांशी संवाद साधण्यात आला. विविध जातीधर्मीय मतदारांच्या सहभागाने प्रभाग 11 मध्ये भाजपचा जनसंवाद दौरा एकतेचे दर्शन घडवणारा ठरला
पाणी समस्या, स्वच्छतेचा प्रश्न सोडवणार
यावेळी बोलताना मा. आ. संजीवरेड्डी बोदकुरवार म्हणाले की या प्रभागातील नागरिकांचे भाजपला नेहमीच पाठबळ मिळाले आहे. या निवडणुकीतही या प्रभागातील मतदार पाठिशी राहणार असा ठाम विश्वास आहे. या प्रभागातील पाईपलाईन जुनी असल्याने या प्रभागातील काही वार्डात पाण्याची समस्या आहे. ही समस्या सोडवण्याचा आमचा प्रयत्न राहणार. यासह स्वच्छता तसेच नागरिकांच्या इतर समस्या सोडवण्यासाठीही आमचे उमेदवार कटिबद्ध राहणार. – मा. आ. संजीवरेड्डी बोदुकुरवार

या जनसंवाद यात्रेला भाजपचे शहर अध्यक्ष ऍड नीलेश चौधरी, जिल्हा उपाध्यक्ष अंकुश बोढे, भाजप सरचिटणीस हितेश अटारा, भाजप शहर उपाध्यक्ष मनोज सरमोकदम, सत्यजीत ठाकूरवार यांच्यासह भाजपचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते व समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रभाग क्र. 11 मध्ये महाराष्ट्र बँक चौक, टागोर चौक, सर्वोदय चौक, 8 नंबर शाळा, सेवा नगरचा काही भाग ते निर्गुडा नदी पर्यंत, रंगारी पुरा, गौरकार चौक, शिवनेरी चौक, गणेश पूर रोड इत्यादी परिसरांचा समावेश होतो. विविध जाती धर्म मतदार या मतदार संघात आहेत.



Comments are closed.