मुस्लिम व दलित वस्तीमध्ये भाजपच्या प्रचाराला दमदार प्रतिसाद
वस्तीमध्ये रॅलीचे जंगी स्वागत - विकासाला साथ देण्याचे मतदारांचे वचन
बहुगुणी डेस्क, वणी: निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असून भाजप सर्व आघाड्यांवर आघाडी घेताना दिसत आहे. विशेषतः मुस्लिम व दलित (मागासवर्गीय) वस्त्यांमध्ये पक्षाच्या प्रचाराला अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे. आ. संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या रॅलीदरम्यान नागरिक उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आहे. तसेच स्थानिक मुस्लिम व दलित समाजातील मतदार जात-धर्माच्या चौकटीपलीकडे जाऊन विकासाला साथ देण्याचे वचन देत आहे. या उत्साही प्रतिसादामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून आगामी निवडणुकीत पक्षाला व्यापक पाठिंबा मिळत असताना दिसत आहे.
26 नोव्हेंबरला संविधान दिनी भाजपची प्रभाग 6 मध्ये नगरसेवक पदाच्या उमेदवार सौ. धम्मदिना हरिष पाते व विलास मारोतराव डवरे तसेच नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. विद्या खेमराज आत्राम यांच्या प्रचारार्थ रॅली काढण्यात आली. सकाळी 9 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून रॅलीला सुरुवात झाली. महात्मा फुले चौक, वासेकर ले आऊट, गणेशपूर रोड, राजीव गांधी चौक, भीम नगर, सम्राट अशोक नगर, वामनघाट रोड इत्यादी भागात रॅली निघाली. या भागातील दलित वस्तीमध्ये रॅलीचे जोरदार स्वागत करण्यात आले.
तर 27 नोव्हेंबर प्रभाग क्रमांक 10 चे उमेदवार भाजप उमेदवार आरती वांढरे, अनिल चिंडालिया आणि नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार विद्या खेमराज आत्राम यांच्या प्रचारार्थ रॅली काढण्यात आली. जत्रा रोड, मोमीनपुरा, हमिद चौक, जागृती चौक, नटराज चौक इत्यादी भागात ही रॅली निघाली. या प्रभागात मुस्लिम मतदारांची संख्या लक्षनीय आहे. प्रचार रॅलीत मुस्लिम वस्तीमध्ये भाजपच्या रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. चार दिवसांआधी याच प्रभागातील मोमिनपुरा येथील शेकडो तरुणांनी भाजपमध्ये प्रवेश घेतला होता.

सर्वांगीण विकास हिच आमची ओळख
“जात-धर्माच्या चौकटीपलीकडे जाऊन सर्वांसाठी विकासकामे करणे हीच आमची ओळख आहे. मुस्लिम व दलित वस्त्यांमध्ये मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद हेच दाखवते की नागरिक विकासाला प्राधान्य देत आहेत. या वस्ती कायम विकासापासून दूर राहायच्या. माझ्या कार्यकाळात या भागातील मुलभूत समस्या सोडवण्यावर मी नेहमीच भर दिला. विकासाच्या बाबतीत कोणतीही तडजोड केली नाही.” – मा. आ. संजीवरेड्डी बोदकुरवार

या रॅलीत भाजपचे प्रदेश किसान मोर्चा उपाध्यक्ष दिनकर पावडे, जिल्हा उपाध्यक्ष रवी बेलुकर, अंकुश बोढे, शहराध्यक्ष अॅड. निलेश चौधरी, जिल्हा सचिव नितीन वासेकर, जिल्हा संयोजक (सोशल मीडिया) दीपक पाऊणकर, शहर महामंत्री हितेन अटारा, व्यापारी आघाडी सरचिटणीस नितीन बिहारी, तुकाराम माथनकर, कैलास पिंपराडे, माजी शहराध्यक्ष श्रीकांत पोटदुखे, कवाडकर सर, अनुराग काथेड, आशिष जैन यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.



Comments are closed.