भरधाव ट्रकची दुचाकीला धडक, चिमुकलीचा मृत्यू

गणेशपूरजवळ भीषण अपघात; ट्रकचालक फरार

विवेक तोटेवार, वणी: वणी-मूकूटबन रोडवरील गणेशपूर परिसरात भरधाव ट्रकने एका दुचाकीला धडक दिली. यात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले तर दुचाकीवर मागे बसलेली चार वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. 24 जानेवारी रोजी रात्री 9.30 वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. धडक दिल्यानंतर ट्रकचालक फरार झाला. 

मिळालेल्या माहितीनुसार, श्रीनिवास चंद्रय्या गोंन्लावार (वय 37, रा. ड्रीमलँडसिटी, वणी) हे वणी पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. दिनांक 24 जानेवारी रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास ते त्यांची चार वर्षीय मुलगी श्रावनीला मोटारसायकलवर बसवून घरी परतत होते. गणेशपूर येथील पानठेल्याजवळील चढावर मोटारसायकलचा वेग कमी करून ते दुचाकी मुकूटबनकडे वळवित होते. दरम्यान वणीकडून येणाऱ्या एका भरधाव ट्रकने त्यांच्या मोटारसायकलला जोरदार धडक दिली.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

या अपघातात श्रीनिवास गोंन्लावार यांच्या दोन्ही पायांना व चेहऱ्यावर मार लागला तर मुलगी श्रावनीही गंभीर जखमी झाली. ट्रक चालक मात्र वाहन थांबविता न थांबता घटनास्थळावरून पसार झाला. स्थानिकांनी तत्काळ दोघांना सूगम हॉस्पिटल, वणी येथे दाखल केले. डॉक्टरांनी तपासणी करून श्रावनीला हात व पोटावर गंभीर दुखापत झाल्याने पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे रेफर केले. मात्र डॉक्टरांनी श्रावनीचा मृत घोषीत केले. 

या घटनेने वणी परिसरात शोककळा पसरली असून अनोळखी ट्रक चालकाविरुद्ध कायदेशीर कारवाईसाठी वणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलीसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. सध्या ट्रक चालकाचा शोध सुरु आहे. 

Comments are closed.