विवेक तोटेवार, वणी: चिखलगाव येथील महादेव नगरी परिसरात वास्तव्यास असणाऱ्या शिक्षिका युगंधरा स्वप्नील खरवडे (वय अंदाजे 35) यांनी बुधवारी सायंकाळच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.
सायंकाळी सुमारे 6 वाजताच्या दरम्यान त्यांचे पती घरी परतले. त्यांनी दरवाजा वाजवला मात्र प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी घराचा दरवाजा तोडला असता पत्नी गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आल्या. ही वार्ता परिसरात पसरताच पोलिसांना सूचना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात हलविण्यात आला.
युगंधरा खरवडे या वणी येथील राजकुवर महिला महाविद्यालयात प्राचार्य पदावर कार्यरत होत्या. विशेष म्हणजे त्यांनी नुकतीच इतिहास विषयात डॉक्टरेट (Ph.D) पदवी प्राप्त केली होती. त्यांच्या पश्चात पती, एक 11 वर्षाचा मुलगा, तीन महिन्यांचे चिमुकले बाळ असून, या घटनेमुळे परिसरात तसेच शिक्षण क्षेत्रात तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे. आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पुढील तपास पोलीस करत आहेत.




Comments are closed.