संविधानाच्या प्रत वाटपाने प्रजासत्ताक दिन साजरा

संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करून भारतीय प्रजासत्ताकाचे दर्शन

बहुगुणी डेस्क, वणी: भारताचे लोक या संविधानाच्या उद्देशिकेतील शब्दांचे स्मरण करत विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, वणी येथे प्रजासत्ताक दिन अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून त्यांच्या देशाच्या जडणघडणीतील योगदानाचे कृतज्ञतापूर्वक स्मरण करण्यात आली. त्यानंतर शाळांसोबत आलेल्या प्रत्येक मुलांना बिस्किटांचे पॉकेट वाटप करण्यात आले. प्रत्येक शाळेला एक मोठे संविधान पुस्तक देण्यात आले. तसेच शाळांसोबत आलेल्या सर्व शिक्षक-शिक्षिकांना आणि अभिवादनासाठी आलेल्या नागरिकांनाही संविधानाचे पुस्तक वाटप करण्यात आले.

सकाळी 7.30 वा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हारार्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर संविधानाच्या उद्देशिकेचे सामुहिक वाचन करण्यात आले. डॉ. आंबेडकर चौकात आलेल्या शाळेच्या रॅलीतील मुलांना बिस्किटांचे वाटप करण्यात आले. तर शिक्षकांना संविधानाची प्रत भेट देण्यात आली.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

जात, धर्म आणि पंथ विसरून वणीतील नागरिकांनी या उत्सवात उत्साहाने सहभाग घेतला. हा सोहळा केवळ एक कार्यक्रम नसून देशाप्रती असलेल्या निष्ठेचे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या समता, स्वातंत्र्य व बंधुत्वाच्या विचारांचे दर्शन घडवणारा ठरला. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महिलांचा समावेश होता. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विविध संघटनेच्या लोकांनी परिश्रम घेतले.

 

Comments are closed.