कोर्टातील केस मागे घेण्यास नकार दिल्याने दगडाने मारहाण

पानठेल्यावर वाद. दोघांविरोधात गुन्हा दाखल

बहुगुणी डेस्क, वणी: कोर्टातील केस मागे घेण्यास नकार दिल्याने एका तरुणाला दगड व बुक्यांनी मारहाण करून जीवघेणी धमकी देण्यात आली. मारेगाव तालुक्यातील नेत या गावात रविवारी रात्रीच्या सुमारास घडली. या प्रकरणी मारहाण करणा-यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

फिर्यादी समीर अरुण गिरी (वय 19) हा नेत ता. मारेगाव येथील रहिवारी असून तो ऑटो ड्रायव्हर आहे. दिनांक 25 जानेवारी 2026 रोजी रात्री साडेसात वाजता तो गावातील प्रकाश किशन पुरी (वय 40) यांच्या पानठेल्यावर दारू घेण्यासाठी गेले होते. पैसे देऊन निघत असताना प्रकाश पुरी यांनी समीरला कोर्टातील चालू असलेली केस मागे घेण्यास सांगितले. मात्र त्याने नकार दिला. त्यावर प्रकाश पुरी याने हातातील दगडाने मारहाण केली. या हल्ल्यात समीरच्या डाव्या कानाजवळ व डोक्यावर मारहाण केली.

त्याचवेळी आरोपीसोबत गंगाधर लक्ष्मण उईके (वय 38) हा देखील पानठेल्यावर उपस्थीत होता. तो देखील मारहाण करण्यास पुढे आला व त्यानेही समीरला बुक्यांनी मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता दोन्ही आरोपींनी “जर कोर्टातील केस मागे घेतली नाही तर तुमच्या घरातील एखाद्याला ठार मारल्याशिवाय राहणार नाही” अशी धमकी दिली.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

मारहाण झाल्यानंतर समीरने मारेगाव पोलीस ठाणे गाठत याबाबत तक्रार दिली. दोन्ही आरोपीवर बीएनएसच्या कलम 118 (1),,351 (2),(3) 3(5) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा तपास ASI दिंगाबर किनाके करीत आहेत.

Comments are closed.