JOB AlERT: Computer Hardware & Network Engineer पदांसाठी भरती
सुप्रसिद्ध आयटी कंपनीत काम करण्याची संधी, फ्रेशर देखील अप्लाय करू शकतात
बहुगुणी डेस्क, वणी: शहरात नोकरीच्या शोधात असलेल्या युवक-युवतींसाठी एक आनंदाची बातमी असून, सुप्रसिद्ध मोदी इन्फोनेट डिजिटल नेटवर्क या आयटी कंपनीतर्फे वणी येथील ऑफिससाठी Computer Hardware & Network Engineer पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. ही नोकरी पूर्णवेळ स्वरूपाची आहे. इच्छुकांनी आपला बायोडाटा (CV) ई-मेलद्वारे infonetwani@gmail.com या पत्त्यावर पाठवावा किंवा फक्त CV व्हॉट्सॲपद्वारे 9960281314 या क्रमांकावर पाठवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना कॉम्प्युटर हार्डवेअर इंन्स्टालेशन, देखभाल व ट्रबलशूटिंग, तसेच LAN/WAN नेटवर्कचे सेटअप आणि कॉन्फिगरेशन, राऊटर, स्विच आणि अॅक्सेस पॉईंट यांसारख्या नेटवर्क उपकरणांचे इन्स्टालेशन, इंटरनेट कनेक्टिव्हिटीशी संबंधित समस्या शोधून त्यांचे निराकरण करणे, यासोबतच फायबर व विविध नेटवर्क डिव्हाइसेसचे मॉनिटरिंग तसेच बेसिक सर्व्हर मॉनिटरिंग, क्लायंट साइटवर नेटवर्क समस्या दूर करणे, इत्यादी कार्य राहणार आहे.
कोण करू शकतात अप्लाय?
या पदासाठी उमेदवाराला कॉम्प्युटर हार्डवेअर आणि नेटवर्किंगचे चांगले ज्ञान असणे आवश्यक आहे. CCNA किंवा बेसिक नेटवर्किंग संकल्पना जसे की IP Addressing, VLAN आणि Routing यांचे समज असणे अपेक्षित आहे. तसेच Router आणि Switch कॉन्फिगरेशनचा अनुभव आणि Network Troubleshooting करण्याची कौशल्ये असणे गरजेचे आहे. या पदासाठी 1–3 वर्षांचा अनुभव प्राधान्याने अपेक्षित असला तरी नेटवर्किंगचे चांगले ज्ञान असलेल्या फ्रेशर उमेदवारांनाही अर्ज करता येईल.
इच्छुक व पात्र उमेदवारांनी आपला बायोडाटा (CV) ई-मेलद्वारे infonetwani@gmail.com या पत्त्यावर पाठवावा किंवा फक्त CV व्हॉट्सॲपद्वारे 9960281314 या क्रमांकावर पाठवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
ऑफिस पत्ता – MODI INFONET DIGITAL NETWORK
ब्लॉक नं. 6, 6 वा मजला, कक्ष क्र. 601 व 602, असोसी क्लस्टर,
राम शेवाळकर बिझनेस पार्क, वणी, जि. यवतमाळ, महाराष्ट्र – 445304



Comments are closed.