विवेक तोटेवार, वणी: शहरातील सिंधी कॉलनी येथील रहिवासी असलेले सूरज कवडुजी चावला (वय 48) यांचे वणी-कायर रोडवर अपघात झाला होता. त्यांना नागपूर येथे उपचारासाठी रेफर करण्यात आले होते. मात्र गुरुवारी उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, सूरज हे बुधवारी दिनांक 4 मार्च रोजी माल सप्लाय करण्यासाठी कायर व इतर गावात दुचाकीने गेले होते. सुमारे 4.30 वाजताच्या सुमारास वणीला परत येताना त्यांच्या दुचाकीला एका अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या अपघातात ते गंभीर जखमी झाले. रोडवरील नागरिकांनी तातडीने त्यांना तातडीने वणी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने डॉक्टरांनी त्यांना पुढील उपचारासाठी नागपूर येथे रेफर करण्यात आले.
नागपूर येथील एका रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होता. मात्र गुरुवारी दिनांक 5 मार्च रोजी दुपारी सुमारे 3 वाजता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. सूरज चावला यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, भाऊ दीपक चावला व वहिनी असा आप्तपरिवार आहे. त्यांच्या अकाली निधनामुळे परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.



Comments are closed.