बहुगुणी डेस्क, वणी: दारूच्या नशेत आलेल्या एका तरुणाने घरासमोर उभे राहून हैदोस घालत दांड्याने हल्ला केला. या हल्ल्यात एक जण जखमी झाला असून भांडण सोडवण्यासाठी आलेल्यालाही मारहाण करण्यात आली. तसेच घरातील टीव्ही देखील फोडली असे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी वणी पोलिसांनी आरोपीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. दामले फैल येथे ही घटना घडली.

तक्रारीनुसार, फिर्यादी अभय शंकर भलमे (वय 34) हा दामले फैल येथील रहिवासी आहे. त्यांच्या शेजारी गणेश वाघमारे यांचे घर आहे. त्यांचा जावई पवन विनोद सराटे (वय 23, रा. खरबडा मोहल्ला, वणी) हा नेहमी वाघमारे त्यांच्या घरी ये-जा करत असतो. 3 मार्च रोजी सायंकाळी सुमारे 7 वाजताच्या सुमारास अभय भलमे हे आपल्या घरी होते. दरम्यान पवन सराटे हा दारूच्या नशेत त्यांच्या घरासमोर आला आणि कोणतेही कारण नसताना शिवीगाळ करू लागला.
या प्रकारामुळे अभय भलमे यांनी गणेश वाघमारे यांना तुमचा जावई पवन सराटे मला विनाकारण शिवीगाळ करीत आहे. त्यानंतर त्यांनी पवन सराटे याला शांत राहण्यास सांगत समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने उलट संतापून हातात असलेल्या लाकडी दांड्याने अभय भलमे यांच्या डोक्याच्या मारहाण केली, ज्यामुळे ते जखमी झाले. यावेळी आरोपीने दरम्यान, हा वाद सोडवण्यासाठी अभय भलमे यांचा भाऊ मधे पडला असता त्यालाही आरोपीने मारहाण करत शिवीगाळ केली.
घटनेनंतर अभय उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात गेला. तेव्हा आरोपीने त्यांच्या घरातील टीव्ही फोडून नुकसान केल्याचीही तक्रारीत नमूद करण्यात आली आहे. या घटनेनंतर अभय भलमे यांनी थेट वणी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार नोंदवली. आरोपी पवन विनोद सराटे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 115(2), 118(1), 324(4), 351(2), 351(3) आणि 352 अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास वणी पोलीस करीत आहेत.



Comments are closed.