पुरुषोतत्तम नवघरे, वणी: शहरात व्यक्तिमत्त्व विकास व अंतर्गत जागृतीसाठी मार्गदर्शन करणाऱ्या ‘द महाआसमानी मॅजिक ऑफ अवेकनिंग’ या विशेष ज्ञान शिविराचे आयोजन करण्यात आले आहे. हॅपी थॉट्स तर्फे आयोजित हे शिविर 8 मार्च 2026 रोजी दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत पार पडणार आहे. हे ‘संपूर्ण लक्ष शिविर’ अनुभव तेजस्थान, माऊली निवास, सतीशजी पिंपळे यांचे निवासस्थान, नांदेपेरा रोड, तिरुपती मंगल कार्यालयासमोर, लक्ष्मी नगर, वणी येथे आयोजित करण्यात आले आहे. या शिविरामध्ये सहभागी झालेल्यांना मानसिक तणाव, चिंता आणि ओव्हरथिंकिंगपासून मुक्त होण्यासाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
तसेच जीवनातील फोकस व स्पष्टता वाढविणे, योग्य निर्णय घेण्याची क्षमता विकसित करणे, आत्मविश्वास व प्रेरणा वाढविणे यांसारख्या विषयांवरही मार्गदर्शन केले जाणार आहे. यासोबतच जीवनाला स्पष्ट उद्देश मिळणे, भावनिक संतुलन राखणे, मन:शांती अनुभवणे आणि सकारात्मक स्थायी परिवर्तन घडवून आणण्याबाबतही सखोल माहिती देण्यात येणार आहे.
या ज्ञान शिविरात कुटुंबीय, नातेवाईक आणि मित्रांसह मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. अधिक माहितीसाठी 9423690550 व 9850780260 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


Comments are closed.