अपघातग्रस्त WCL कर्मचाऱ्याला ₹50 लाखांचा दावा मंजूर

SBI वणी शाखेचा पुढाकार, अपघातात गमवला होता पाय

पुरुषोत्तम नवघरे, वणी: रस्ता अपघातात उजवा पाय गमावलेल्या वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड (WCL) मधील कर्मचारी विजय पाल यांना स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) वणी शाखेमार्फत ₹50 लाखांचा अंशतः अपंगत्व विमा दावा मंजूर करण्यात आला आहे. या मदतीमुळे अपघातग्रस्त कर्मचाऱ्याला मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे. 

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी झालेल्या गंभीर रस्ता अपघातात विजय पाल यांचा उजवा पाय गमवावा लागला. या घटनेनंतर त्यांच्या नावावर असलेल्या SBI च्या कॉर्पोरेट सॅलरी पॅकेज खात्याअंतर्गत मिळणाऱ्या अपघाती विमा संरक्षणाचा लाभ मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली.

त्यानंतर SBI वणी शाखेच्या पुढाकाराने संबंधित विमा कंपनीकडे दावा सादर करण्यात आला. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ₹50 लाखांचा अंशतः अपंगत्व विमा दावा मंजूर करण्यात आला. या मदतीमुळे अपघातग्रस्त विजय पाल यांना आर्थिक आधार मिळाला असून बँकेच्या तत्पर कार्यवाहीचे नागरिकांकडून तसेच सहकाऱ्यांकडून कौतुक करण्यात येत आहे.

Comments are closed.