वणीतील मंगला झिलपे यांचा महिला दिनी ‘विशेष कार्यगौरव’

यवतमाळ पोलीस विभागातर्फे सामाजिक कार्याबाबत सन्मान

पुरुषोत्तम नवघरे, वणी : महिला सक्षमीकरण, जनजागृती आणि सामाजिक परिवर्तनासाठी सातत्याने कार्य करून समाजहितासाठी मोलाचे योगदान दिल्याबद्दल मंगला पद्माकर झिलपे यांना यंदाच्या जागतिक महिला दिनानिमित्त यवतमाळ जिल्हा पोलिसांच्या वतीने ‘विशेष कार्यगौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. पोलिस अधीक्षक कुमार चिंता यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

महिलांना विविध क्षेत्रात पुढे येण्यासाठी प्रोत्साहन देणे, समाजात सकारात्मक विचार रुजविणे तसेच सामाजिक प्रश्नांबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न उल्लेखनीय ठरले आहेत. त्यांच्या कार्यामुळे समाजात सकारात्मक बदल घडून अनेक महिलांना प्रेरणा मिळाली आहे.

पोलीस विभागाला तात्काळ मदत करणे, पोलीस कार्यात सहकार्य करणे यासोबतच सामाजिक व धार्मिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग दर्शविणे हे त्यांचे कार्य विशेष ठरले आहे. यवतमाळ जिल्हा शांतता समिती, वणी पोलीस स्टेशन दक्षता समिती सदस्य तसेच सुतार समाज महिला मंचच्या अध्यक्ष म्हणून त्यांनी केलेल्या योगदानाची दखल घेत हा सन्मान प्रदान करण्यात आला. सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी झिलपे यांचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील कार्याला शुभेच्छा दिल्या.

Comments are closed.