शहीद दिनानिमित्त राजूर व परसोड्यात क्रांतिकारकांना भावपूर्ण श्रद्धांजली

समाजवादी व शोषणमुक्त भारताच्या संकल्पनेवर मान्यवरांचे मार्गदर्शन

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील राजूर कॉलरी व परसोडा येथे 23 मार्च रोजी शहीद दिनानिमित्त तरुण क्रांतिकारक शहीद भगतसिंग, सुखदेव व राजगुरू यांना मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष (माकप) व किसान सभा यांच्या वतीने अभिवादन करण्यात आले.

Birthday

या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतात सांगितले की, देशाला इंग्रजांच्या साम्राज्यवादी गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी लढताना भगतसिंग यांनी केवळ राजकीय स्वातंत्र्यच नव्हे, तर शोषणमुक्त व जातीविहीन समाजवादी व्यवस्था निर्माण करण्याचा विचार मांडला होता. रशियन क्रांती मधून प्रेरणा घेत त्यांनी समाजपरिवर्तनाचा मार्ग स्वीकारला. त्यांच्या या विचारांमुळे इंग्रज सत्तेला धोका निर्माण झाल्याने अवघ्या 23 व्या वर्षी त्यांना फाशी देण्यात आली.

स्वातंत्र्यानंतर 75 वर्षांनंतरही ‘फोडा आणि राज्य करा’ ही नीती काही प्रमाणात आजही दिसून येत असल्याने भगतसिंग यांचे विचार आजच्या काळात अधिक प्रासंगिक असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

राजूर कॉलरी येथे माकपचे जिल्हा सचिव कॉ. अॅड. कुमार मोहरमपुरी, माजी पंचायत समिती सदस्य अशोक वानखेडे, महेंद्र श्रीवास्तव, विजय तोताडे, राजेंद्र पुडके, अमृत फुलझेले, गणेश रामटेके यांनी विचार मांडले. तर परसोडा येथे तालुका सचिव कॉ. गजानन ताकसांडे व जिल्हा कमिटी सदस्य कॉ. बादल कोडापे यांनी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमास राजूर कॉलरी येथे महेंद्र अंबागडे, शुभम अकोटकर, बंडू ठमके, जयंत कोयरे, साजिद खान, अमित करमरकर, सिनू कलवलवार, मनोज सोनेकर, खालिद हुसेन, विजय जंगीलवार, राकेश इग्रपवार, जाहिद हुसेन, अमर नगराळे, रिजवान खान, कुमार कोंकटवार, अजय भुसारी, विशाल पंधरे आदी उपस्थित होते.

तसेच परसोडा येथे मंगेश सरोदे, वामन बोबडे, विनायक कोवे, दिनकर सरोदे, महादेव टेकाम, विठ्ठल आत्राम, बबन ताकसांडे, संजय कोडापे, अनुसया टेकाम, कुंताबाई चटप, शकुनाबाई आत्राम, रमेश ताकसांडे, बेबीबाई सरोदे, किशोर बडवाईक, मंथनाबाई उपरे, मंगेश बडवाईक आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments are closed.