बोरगाव (मेंढोली) येथील विठ्ठलराव सखाराम पिदूरकर यांचे निधन
कैलासनगर येथे करण्यात आले अंत्यसंस्कार
बहुगुणी डेस्क, वणी: तालुक्यातील बोरगाव (मेंढोली) येथील रहिवासी विठ्ठलराव सखाराम पिदूरकर (वय 80) यांचे वृद्धापकाळाने रविवारी कैलासनगर येथे दुःखद निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर सोमवारी, दिनांक 23 मार्च रोजी दुपारी कैलासनगर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात अरविंद, अनिल अशी मुले, सुना, एक मुलगी, जावई तसेच नातवंडे असा मोठा आप्तपरिवार आहे. त्यांच्या निधनामुळे परिसरात शोककळा पसरली असून अनेकांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
Comments are closed.