विद्यार्थ्यांसाठी खुशखबर – MHT-CET गणितासाठी मोफत मार्गदर्शन

चाप्टरवाईज सोल्युशन - वणीतील डॉ. विश्वास सुंदराणी यांचा अभिनव उपक्रम

बहुगुणी डेस्क, वणी: स्पर्धा परीक्षा म्हटलं की विद्यार्थ्यांसमोर सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो—अभ्यास कुठून सुरू करायचा? अभ्यासाचा प्रचंड भार असतो, पण योग्य मार्गदर्शन न मिळाल्याने अनेकांना यश मिळत नाही. याचं मुख्य कारण म्हणजे परीक्षेचा पॅटर्न समजत नाही, MCQ प्रश्नांचा सराव कमी असतो. प्रश्न कसे विचारले जातात, त्यामागची संकल्पना काय असते आणि ते सोडवायचे कसे—हे समजलं की अभ्यास सोपा होतो.

याच विचारातून वणीतील डॉ. विश्वास सुंदराणी यांनी एक अभिनव उपक्रम सुरू केला आहे. त्यांनी MHT-CET या अभियांत्रिकी प्रवेश परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी गणिताचे Chapter wise MCQ सोल्यूशन मोफत उपलब्ध करून दिले आहे. या उपक्रमात त्यांना त्यांचे मित्र नितीश कुमार यांची साथ मिळत आहे. दिल्ली येथे त्यांनी डिजिटल सेटअप तयार केला असून त्यातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाते.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

या मालिकेत फक्त प्रश्न सोडवले जात नाहीत, तर प्रत्येक प्रश्नामागची संकल्पना सोप्या भाषेत समजावून सांगितली जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांचा गणित विषय मजबूत होतो आणि आत्मविश्वास वाढतो. महागडे क्लासेस परवडत नसलेल्या ग्रामीण व गरीब विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम मोठा आधार ठरत आहे. हा उपक्रम पूर्णपणे मोफत असून ‘modx4maths’ या यूट्यूब चॅनेलवर उपलब्ध आहे.

राज्यभरातून विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. अनेक विद्यार्थ्यांनी या उपक्रमामुळे गणिताची भीती दूर झाल्याचे सांगितले आहे. या उपक्रमाचा अधिकाधिक विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. सुंदराणी यांनी केले आहे. 

https://www.youtube.com/@modx4maths

Comments are closed.