वणीत वेदिक मॅथ्स क्लासेसचा 3 दिवसीय मोफत क्लास व वर्कशॉप

गणित सोपे, जलद व मजेदार पद्धतीने शिकवण्यावर भर, आजच संपर्क साधा

बहुगुणी डेस्क, वणी: वणी शहरातील विद्यार्थ्यांसाठी गणित विषय अधिक सोपा, जलद आणि रंजक बनवण्याच्या उद्देशाने वेदिक मॅथ्स क्लासेसची नवी बॅच 1 एप्रिल 2026 पासून सुरू होत आहे. ललित फाउंडेशनच्या माध्यमातून आयोजित या वर्गांमध्ये विद्यार्थ्यांना गणिताची भीती दूर करून आत्मविश्वास वाढवण्यावर विशेष भर दिला जाणार आहे. दरम्यान क्लास आधी फ्री डेमो क्लास आणि 3 दिवसांचे मोफत वर्कशॉप देखील आयोजित करण्यात आला आहे. या वर्कशॉप व डेमो क्लासचा लाभ घ्यावा, असे आवाहन संचालक प्रा. प्रवीण सातपुते (एम.ई. कॉम्प्युटर सायन्स) यांनी केले आहे.

या क्लासेसमध्ये वेदिक गणिताच्या सोप्या आणि प्रभावी तंत्रांचा वापर करून विद्यार्थ्यांना जलद गणना करण्याचे कौशल्य विकसित केले जाणार आहे. “Make Maths Easy, Fast & Fun” या संकल्पनेवर आधारित या उपक्रमात विद्यार्थ्यांची अचूकता, वेग आणि एकूण बौद्धिक क्षमता वाढवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या क्लासला वर्ग 2 पासून पुढे कोणत्याही विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार आहे. स्पर्धा परीक्षा तसेच इतर परीक्षेसाठी देखील हा क्लास उपयुक्त आहे.

या वर्गांचे मार्गदर्शन अनुभवी शिक्षक प्रवीण सातपुते (एम.ई. कॉम्प्युटर सायन्स) करणार असून त्यांना 20 वर्षांहून अधिक अध्यापनाचा अनुभव आहे. विद्यार्थ्यांसाठी सायंकाळी 5 ते 6:30 आणि 7 ते 8:30 या वेळेत दोन बॅचेस ठेवण्यात आल्या आहेत. तसेच विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव मिळावा यासाठी फ्री डेमो क्लास आणि 3 दिवसांचा मोफत वर्कशॉप देखील आयोजित करण्यात आले आहे. मर्यादित जागा असल्यामुळे इच्छुक पालकांनी लवकरात लवकर नोंदणी करण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

वैदिक मॅथ्स म्हणजे काय?
वैदिक मॅथ्स म्हणजे प्राचीन भारतीय गणित पद्धतीवर आधारित एक सोपी, जलद आणि प्रभावी गणना करण्याची प्रणाली आहे. या पद्धतीत काही विशिष्ट सूत्रे (सूत्रे आणि उपसूत्रे) वापरून अवघड वाटणारे गणित अगदी सहज आणि कमी वेळेत सोडवता येते. पारंपरिक पद्धतीपेक्षा कमी स्टेप्समध्ये उत्तर मिळत असल्याने विद्यार्थ्यांचा वेग, अचूकता आणि आत्मविश्वास वाढतो. विशेषतः बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार तसेच स्पर्धा परीक्षांमध्ये उपयुक्त असलेली जलद गणना या पद्धतीने सोपी होते, त्यामुळे वैदिक मॅथ्स विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरते.

हे क्लासेस ब्राइट माईंड किड्ज प्ले स्कूल, सोनी इलेक्ट्रिकल मॉल जवळ, वॉटर सप्लाय रोड, वणी येथे होणार असून अधिक माहितीसाठी 7276782458 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Comments are closed.