नगर पालिका शाळा क्र. 8 मध्ये नवीन शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश सुरू
इयत्ता 1 ली ते 7 वीपर्यंत प्रवेश, सेमी-इंग्रजी माध्यमात शिकण्याची संधी
बहुगुणी डेस्क, वणी: वणी येथील न.प.उ. प्राथमिक शाळा क्र. 8 मध्ये नवीन शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली असून पालकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या शाळेत विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी दर्जेदार शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे.
शाळेत इयत्ता 1 ली ते 7 वीपर्यंत प्रवेश उपलब्ध असून सेमी-इंग्रजी (Semi-English) माध्यमाची विशेष सोय करण्यात आली आहे. अनुभवी व तज्ज्ञ शिक्षकवृंद विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देत असून त्यांच्या सर्वांगीण विकासावर विशेष भर दिला जात आहे.
प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रांमध्ये आधार कार्ड, जन्म दाखला तसेच मागील वर्षाचा निकालपत्र आवश्यक असल्याची माहिती शाळा प्रशासनाने दिली आहे. पालकांनी ही कागदपत्रे सोबत घेऊन प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी व प्रवेशाबाबत संपर्क साधण्यासाठी मुख्याध्यापक देवेंद्र सुधाकर खरवडे (संपर्क: 8805904847) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, “आपल्या पाल्याला दर्जेदार शिक्षण देण्याची ही सुवर्णसंधी सोडू नका,” असे आवाहन शाळेच्या वतीने करण्यात आले असून प्रवेशासाठी पालकांनी तातडीने पुढाकार घ्यावा, असेही सांगण्यात आले आहे.




Comments are closed.