‘उडान 2026’ शिबिरातून विद्यार्थ्यांना नवी दिशा, ABVP चा उपक्रम

उच्च शिक्षण, स्पर्धा परीक्षा, व्यक्तिमत्व विकासावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन

विवेक तोटेवार, वणी: अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) वणी नगर यांच्या वतीने आयोजित ‘उडान 2026’ व्यक्तिमत्व विकास शिबिर 5 एप्रिल रोजी येथील शेतकरी मंदिर सभागृहात उत्साहात पार पडले. या शिबिरात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देत विविध विषयांवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभले.

शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी अमरावती विद्यापीठ अधिसभा सदस्य गजानन कासावर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. व्यक्तिमत्व विकास या विषयावर शिक्षक प्रितेश लखमापूरे यांनी प्रभावी मार्गदर्शन केले. तसेच उच्च शिक्षणाचे महत्त्व आणि नवीन शैक्षणिक धोरण या विषयांवर लोकमान्य टिळक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रसाद खानझोडे यांनी सखोल माहिती दिली.

स्पर्धा परीक्षा, मुलाखत कौशल्य आणि सकारात्मक विचारसरणी या विषयांवर ज्ञानदा स्पर्धा परीक्षा केंद्राचे संचालक वैभव ठाकरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सर्व वक्त्यांनी आपल्या व्याख्यानातून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी आवश्यक घटकांवर प्रकाश टाकत त्यांना प्रेरित केले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

कार्यक्रमाची प्रस्तावना अभाविप वणी नगराचे उपाध्यक्ष चैतन्य तुरविले यांनी केली. शिबिराचे संचालन नगरमंत्री आयुषी फुलेवार यांनी केले, तर सूत्रसंचालन नयन क्षीरसागर यांनी केले. या प्रसंगी विभाग संयोजक नीरज चौधरी, जिल्हा संयोजक चेतन राऊत, विनय पुराणकर, वैष्णवी बर्डे, मानसी सहारे, पुष्कर सहारे तसेच जिल्हा संघटन मंत्री वैभव वाघमारे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments are closed.