सक्षम युथ स्पोर्ट अकॅडमीचे ‘उन्हाळी क्रिकेट प्रशिक्षण शिबिर – 2026’ जाहीर
6 मे ते 26 जूनदरम्यान वणीत आयोजन; 9 ते 19 वयोगटासाठी संधी, नोंदणी सुरू
विवेक तोटेवार वणी: उन्हाळ्याच्या सुट्ट्यांचा सदुपयोग करून युवकांमध्ये क्रीडा कौशल्य विकसित व्हावे, या उद्देशाने सक्षम युथ स्पोर्ट अकॅडमीच्या वतीने ‘उन्हाळी क्रिकेट प्रशिक्षण शिबिर – 2026’ आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरासाठी विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून प्रवेश नोंदणीला सुरुवात झाली आहे.
हे शिबिर 6 मे 2026 ते 26 जून 2026 या कालावधीत सक्षम इंग्लिश मीडियम स्कूलचे मैदान, न. प. शाळा क्र. 9 च्या बाजूला, दामले लेआउट, वणी येथे पार पडणार आहे. दररोज सकाळी 6:30 ते 8:30 आणि सायंकाळी 4:30 ते 6:30 अशा दोन सत्रांमध्ये प्रशिक्षण दिले जाणार आहे. 9 ते 19 वर्षे वयोगटातील मुला-मुलींसाठी हे शिबिर खुले आहे.
शिबिरात व्यावसायिक क्रिकेट प्रशिक्षणासोबतच फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण, प्रत्यक्ष सामना सराव, फिटनेस व चपळता प्रशिक्षण तसेच वैयक्तिक कौशल्य विकासावर विशेष भर दिला जाणार आहे. अनुभवी प्रशिक्षकांकडून मार्गदर्शन मिळणार असल्यामुळे सहभागी विद्यार्थ्यांना दर्जेदार प्रशिक्षणाची संधी उपलब्ध होणार आहे.
मर्यादित जागा असल्यामुळे ‘प्रथम येणाऱ्यास प्राधान्य’ या तत्त्वावर प्रवेश दिला जाणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
या उपक्रमासाठी संघदीप भगत, कर्मा तेलंग, पायल तोडसाम, निखिल तेलंग, विजय बदकी, प्रतीक मत्ते, आकाश कनोजिया आणि मनमोहन पामुलवार हे प्रशिक्षक व संपर्क प्रमुख म्हणून कार्यरत आहेत.
उन्हाळ्यातील सुट्टीत मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी हे शिबिर उपयुक्त ठरणार असून वणी परिसरातील क्रीडाप्रेमींमध्ये या उपक्रमाबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
संपर्क क्रमांक:
संघदीप भगत – 9822699908
निखिल तेलंग – 9096198646
विराज बदकी – 7768838133
प्रतीक मत्ते – 9112344953
कर्मा तेलंग – 8856060992



Comments are closed.