आनंद नगर येथील संजय नानाजी वनकर यांचे निधन

आज संध्याकाळी 6 वा. राहत्या घरून अंत्ययात्रा

बहुगुणी डेस्क, वणी: वणी शहरातील आनंदनगर परिसरातील रहिवासी तथा ठोक व चिल्लर भाजी विक्रेते म्हणून परिचित असलेले संजय नानाजी वनकर (वय 55) यांचे शुक्रवारी (दि. 12 जून 2026) नागपूर येथे उपचारादरम्यान दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी समजताच आनंदनगर परिसरासह शहरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी त्यांना निमोनियाचा त्रास झाल्याने पुढील उपचारासाठी नागपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू असताना शुक्रवारी दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

संजय वनकर हे मनमिळाऊ स्वभावाचे, सर्वांना मदतीचा हात देणारे आणि प्रामाणिक भाजी विक्रेते म्हणून वणी शहरात परिचित होते. त्यांच्या अकाली निधनामुळे मित्रपरिवार, ग्राहक तसेच परिसरातील नागरिकांमध्ये शोक व्यक्त केला जात आहे.

त्यांच्या पश्चात आई, पत्नी आणि दोन मुली असा आप्त परिवार आहे. कुटुंबातील कर्ता पुरुष अचानक काळाच्या पडद्याआड गेल्याने वनकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

त्यांच्या पार्थिवावर आज, शुक्रवार (दि. 12 जून 2026) रोजी सायंकाळी 6 वाजता वणी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. संजय वनकर यांच्या निधनाबद्दल विविध सामाजिक, व्यावसायिक व नागरिक स्तरांतून श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.

Comments are closed.