बहुगुणी डेस्क, वणी: रंगारीपुरा येथील रहिवासी भारती शामसुंदर भटारकर (वय 58) यांचे दीर्घ आजाराने शनिवारी रात्री चंद्रपूर येथे निधन झाले. गेल्या काही काळापासून त्या किडनीच्या विकाराने त्रस्त होत्या. त्यांच्यावर उपचार सुरू होते. प्रकृती खालावल्याने त्यांना चंद्रपूर येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, शनिवारी रात्री सव्वा अकराच्या सुमारास उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पती डॉ. शाम भटारकर, एक मुलगी, जावई, नातवंडे असा मोठा आप्तपरिवार आहे. त्यांच्या निधनाने रंगारीपुरा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. आज रविवारी स. 11 वाजता त्यांचे राहते घर रंगारीपुरा येथून अंत्ययात्रा निघणार आहे.
निकेश जिलठे - संपादक वणी बहुगुणी
2007 पासूून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. ग्रामीण व शहरी असा पत्रकारितेचा अनुभव. आजतक, झी, जय महाराष्ट्र, टीव्ही 9 इत्यादी आघाडीच्या टीव्ही मीडियात मुंबई येथे विविध पदावर 10 वर्ष कार्यरत. सध्या एका पीआर एजन्सीचे संचालक तसेच वणी बहुगुणी या वेबसाईटचे मुख्य संपादक. यवतमाळ जिल्ह्यातील पहिले न्यूज पोर्टल वणी बहुगुणी या स्थानिक न्यूज पोर्टलच्या माध्यमातून परिसरातील ज्येष्ठ व नव्या दमाच्या पत्रकारांसह वणी व परिसरातील बातम्या व ताज्या घडामोडी पोहोचवण्याचा एक प्रयत्न. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक विषयावर विविध माध्यमात लिखाण. राज्यातील अनेक ज्येष्ठ नेते व मंत्री यांचे मीडिया कन्सलटन्ट म्हणूनही कार्य.

Comments are closed.