आज वणीत 4 वा. टिळक चौकात ‘काँकरोच’चे आंदोलन

विद्यार्थी समस्या, पेपरलिक प्रकरणी भव्य आंदोलनात

बहुगुणी डेस्क, वणी: दिल्ली येथील जंतरमंतरवर 20 जून रोजी आयोजित करण्यात आलेल्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी वणीतील विविध सामाजिक संघटना, विद्यार्थी आणि स्पर्धा परीक्षा देणारे युवक-युवती एकत्र आले असून, त्यांच्या संयुक्त विद्यमाने आज (शनिवार) वणी येथे एकदिवसीय धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. हे आंदोलन सायंकाळी 4 वाजता टिळक चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर होणार आहे.

दिल्ली येथे ‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अध्यक्ष अभिजित दीपके यांच्या नेतृत्वात होणाऱ्या आंदोलनाशी एकजूट व्यक्त करण्यासाठी वणीतील युवकांनी हा निर्णय घेतला आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

स्पर्धा परीक्षा व विविध प्रवेश परीक्षांमध्ये वारंवार होणाऱ्या पेपरफुटीच्या घटना, वाढती बेरोजगारी तसेच शिक्षण क्षेत्रातील वाढते खाजगीकरण यांसारख्या गंभीर प्रश्नांविरोधात आवाज उठविण्यासाठी हे आंदोलन करण्यात येत असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

युवकांच्या भविष्याशी संबंधित प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधणे हा आंदोलनाचा मुख्य उद्देश असून, नागरिक, विद्यार्थी, पालक आणि युवक-युवतींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आंदोलनाला पाठिंबा द्यावा, असे आवाहन आयोजक संघटनांकडून करण्यात आले आहे.

Comments are closed.