मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर

22 जुलैला बाजोरिया हॉलमध्ये शिबिराचे आयोजन

बहुगुणी डेस्क, वणी: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी, वणी शहरच्या वतीने बुधवार, दि. 22 जुलै 2026 रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. समाजाप्रती आपली बांधिलकी जपत गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे, या सामाजिक उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात यंदा 200 रक्तपिशव्या संकलित करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

हे रक्तदान शिबिर बाजोरिया हॉल, वरोरा रोड, वणी येथे सकाळी 9 ते दुपारी 3 वाजेपर्यंत आयोजित करण्यात येणार आहे. या उपक्रमात भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी तसेच शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदान करावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

रक्तदान हे महादान मानले जाते. एका रक्तदात्यामुळे अनेक गरजू रुग्णांचे प्राण वाचू शकतात. त्यामुळे प्रत्येक इच्छुक रक्तदात्याने स्वतः रक्तदान करण्यासोबतच आपल्या मित्रपरिवार, नातेवाईक आणि सहकाऱ्यांनाही या सामाजिक उपक्रमात सहभागी करून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

शिबिरात सहभागी होणाऱ्या प्रत्येक रक्तदात्याचा आकर्षक भेटवस्तू देऊन गौरव करण्यात येणार आहे. त्यामुळे या सामाजिक उपक्रमाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन 200 रक्तपिशव्यांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन भारतीय जनता पार्टी, वणी शहरचे अध्यक्ष ॲड. निलेश माया महादेव चौधरी यांनी केले आहे.

संपर्क : संयोजक : बालाजी भेदोडकर (युवा मोर्चा अध्यक्ष) – 9738341616
सहसंयोजक : विलास डवरे (शहर उपाध्यक्ष) – 9404526769
सहसंयोजक : वैशाली वातिले (नगरसेवक) – 9421851725
सहसंयोजक : भारती बदखल (शहर उपाध्यक्ष) – 8329116705

शिबिराचे ठिकाण : बाजोरिया हॉल, वरोरा रोड, वणी
वेळ : सकाळी 9.00 ते दुपारी 3.00
आयोजक : भारतीय जनता पार्टी, वणी शहर

Comments are closed.