वाचनालयाला सरपंच लाकडे यांची जागा व ६० हजारांची स्पर्धा परीक्षा पुस्तकांची मदत
सुशील ओझा, झरी: तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ व गाव म्हणून ओळख असलेल्या मुकुटबन गावात नर्सरी ते महाविद्यालय असून विद्यार्थ्यांना mpsc, upsc व इतर अनेक स्पर्धा परीक्षा व अभ्यासाकरिता यवतमाळ, चंद्रपूर, नागपूर ,पुणे व इतर ठिकाणी जावे लागत होते. विद्यार्थीसह घरच्या आईवडिलांना ज्यामुळे आर्थिक भुर्दंड सोसावे लागत होते. याचा पूर्णतः विचार करून मुकुटबनचे सरपंच शंकर लाकडे यांनी वाचनालयाकरिता जागा, खुर्ची, पंखे व इतर वस्तू उपलब्ध करून दिले. सोबतच जवळपास ६० हजार रुपयांचे स्पर्धा परीक्षांचे पुस्तके घेऊन दिले. ज्यामुळे तरुण मुलांपासून तर उच्च शिक्षित मुलांना जनरल नॉलेज पासून सर्वच शिक्षणाचा अभ्यासक्रम वाचनालयात उपलब्ध करण्याचा मानस केला असून लाकडे यांनी केला आहे. एक महिन्यापूर्वी सुरू झालेले वाचनालयात विद्यार्थाकरिता अभ्यासाची माहिती व पुस्तके उपलब्ध झाली आहे. ज्यामुळे शालेय मुला मुलींना याचा फायदा होणार आहे.
मुकूटबनचे सरपंच शंकर लाकडे यांनी पुस्तके उपलब्ध करून देऊन मुकूटबनला शैक्षणिक वळण देण्याचा त्यांचा हा प्रयत्न ऐतिहासिक असल्याचे बोलले जात आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसह जि.प. शाळा, हायस्कूल, महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी अभ्यासिकेचा लाभ घ्यावा.. सोबतच ज्यांना अवांतर वाचण्याची आव़ड आहे अशांना येत्या १४ तारखेपासून सकाळी ९ ते १० या वेळेत कपिल शृंगारे हे स्वतः गणित, भूमिती, बुद्धीमत्ता निशुल्क वर्ग घेणार आहे. तसेच कुणी वाचनालयात शिकविण्याकरिता इच्छुक शिक्षक असतील त्यांनी संपर्क करण्याचे शृंगारे यांनी आवाहन केले आहे. मुकुटबनला कमी दिवसात एवढ्या प्रकारच्या पुस्तकाचा साठा उपलब्ध केल्याने सरपंच लाकडेसह कपिल श्रुंगारे गुरुदेव सेवा मंडळ व सहकारी मित्रांचे स्वागत होत आहे.