सुशील ओझा, झरी: तालुक्यातील अडेगाव येथील शेतकऱ्याच्या बैलाचा सर्पदंशाने मृत्यू झाला. यात त्याचे 40 हजार रुपयांचे नुकसान तर झाले आहेच शिवाय त्याला शेती करण्यात मोठी अडचण निर्माण झाली आहे.
प्राप्त माहिनुसार अडेगाव येथील शेतकरी बाबाराव नानाजी हिवरकर यांचा १७ ऑक्टोबरला सायंकाळी ५ वाजता शेतात बैल बांधून होता. रात्री बैलाला सर्पदंश झाला व त्यातच बैलाचा मृत्यू झाला. पहाटे ही बाब उघडीस आली.
सदर शेतकऱ्याजवळ यापूर्वी मोठी बैलजोडी होती. परंतू आर्थिक परिस्थिती हालाकीची असल्याने खर्च परवड नसल्याने ती विकून दुसरी लहान जोडी घेतली होती. परंतु त्यातीलही एका बैलाला आता सर्पदंशाने मृत्यू झालाय. ऐन शेतीच्या हंगामात कापूस, सोयाबिन काढायच्या वेळीच बैलाचा मृत्यू झाल्याने त्याच्यावर मोठे संकट कोसळले आहे.
याबाबतची तक्रार सदर शेतकऱ्यांनी संबंधित विभागाकडे केली आहे. मृत बैलाचा उत्तरीय तपासणी करण्यात आली असून सदर शेतक्याला त्वरित मदत मिळावी अशी मागणी होत आहे.