इलेक्ट्रिक शॉक लागून इसमाचा दुर्दैवी मृत्यू

दसऱ्यानिमित्त पुजेसाठी पानं आणायला गेला होता इसम

0

ज्योतिबा पोटे, मारेगाव: दसऱ्यानिमित्त पुजेसाठी मोहाची पाने आणायला गेलेल्या इसमाला विजवितरण कंपणीच्या जीवंत तारांचा स्पर्श झाल्याने यात त्याचा मृत्यू झाला. ऐन सणाच्या दिवशी ही दुर्दैवी घटना घडल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.

प्राप्त माहिती ज्ञानेश्वर किसन वाघाडे (65) हे गदाजी बोरी इथले रहिवाशी आहे. दसरा सणाला घरी देवपूजेसाठी मोहाचे पाने आणण्यासाठी ते गावालगतच्या शेतशिवारात गेले. मात्र रात्री उशिरापर्यंत ते घरी पोहोचलेच नाही. त्यामुळे त्यांच्या पत्नीने शोध घेतला असता मोहाच्या झाडावर टार्चच्या प्रकाशात त्यांचे हात दिसले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

त्यांनी लगेचच ही माहिती गावातील लोकांना दिली. गावकऱ्यांनी तिथे पोहोचून शहानिशा केली तर ते ज्ञानेश्वर असल्याची खात्री झाली.

थोडा शोध घेतला असता. त्या झाडावरुन वीजवितरण कंपनीचा जीवंत तार गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या तारांचा स्पर्श झाल्याने त्यांचा मृत्यु झाल्याची तक्रार मृतकाच्या पत्नीने मारेगाव पोलीस स्टेशनला दिली आहे. घटनेचा पुढील तपास मारेगाव पोलीस करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.