चला पेटून उठा !
“चार वेळा भरघोस मतांनी निवडून दिले,
मात्र तुम्ही केले का हो सामान्यांचे भले !
नोटबंदी केली अन जीएसटी आणली,
शेतकरी आणि सामन्यांची फरफट केली !
शासनाने केली चंद्रपुरात दारूबंदी,
पण सांगा ना झाली कुणाची चांदी !
भरमसाठ आहे म्हणे कोळशाचा साठा,
तरी कंपनीला येतो कसा सांगा ना घाटा !
विकासाच्या मारल्या होत्या फक्त बोंबा,
पण अवैध धंद्यांना मिळाला नाही थांबा !
ना शेतकरी हिताचा स्वामिनाथन आयोग आला,
वचन देऊनही ना वेगळा विदर्भ केला !
काँग्रेसच्या काळात बापाला मिळाली नौकरी,
आता उच्च शिक्षित पोरगा करतोय दुकानावर चाकरी !
कामासाठी वणवण भटकते तरुणाई,
तरीही अंधभक्त मारतात बढाई !
गल्लीपासून दिल्लीपर्यंत होती सत्ता,
तरीही विकासाचा नाही थांगपत्ता !
बेरोजगारीने हिरावले समोरचे ताट,
तरीही गुणगुणतात अंध भाट !
अंधभक्तांनो उघडा डोळे, बघा नीट,
अन्यथा कायमचे राहणार अनफिट !
दिलेल्या आश्वासनाचा बट्ट्याबोळ केला,
का म्हणून पुन्हा निवडून द्यायचे बोलघेवड्याला !
विकासाच्या मारल्या खूप थापा,
बोलूच नका आता बस कर रे बापा !
चला पेटून उठा सर्व समाजबांधवांनो तडपून,
अन बाळूभाऊ धानोरकरला आणायचंच निवडून !
– एक मतदार
आपणही बहुगुणी कट्टामध्ये कविता, लेख पाठवू शकता.
निकेश जिलठे - संपादक वणी बहुगुणी
2007 पासूून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. ग्रामीण व शहरी असा पत्रकारितेचा अनुभव. आजतक, झी, जय महाराष्ट्र, टीव्ही 9 इत्यादी आघाडीच्या टीव्ही मीडियात मुंबई येथे विविध पदावर 10 वर्ष कार्यरत. सध्या एका पीआर एजन्सीचे संचालक तसेच वणी बहुगुणी या वेबसाईटचे मुख्य संपादक. यवतमाळ जिल्ह्यातील पहिले न्यूज पोर्टल वणी बहुगुणी या स्थानिक न्यूज पोर्टलच्या माध्यमातून परिसरातील ज्येष्ठ व नव्या दमाच्या पत्रकारांसह वणी व परिसरातील बातम्या व ताज्या घडामोडी पोहोचवण्याचा एक प्रयत्न. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक विषयावर विविध माध्यमात लिखाण. राज्यातील अनेक ज्येष्ठ नेते व मंत्री यांचे मीडिया कन्सलटन्ट म्हणूनही कार्य.