तरुणीचा खून, अर्धनग्न व कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह
जितेंद्र कोठारी, वणी: ब्राह्मणी रोड लगत असलेल्या क्रिष्णा अपार्टमेंट येथे एका 25 वर्षीय तरुणीचा अर्धनग्न व कुजलेल्या अवस्थेत मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली. सदर तरुणी ही वरोरा येथील रहिवासी असून ती वणीत राहत होती. आज सकाळी 10.30 वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. या तरुणीचा खून झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
सविस्तर वृत्त असे की वणीतील जैन ले आउटच्या टोकाला असलेल्या ब्राह्मणी रोड जवळ पेट्रोल पंम्पाच्या मागे क्रिष्णा अपार्टमेंट नावाची एक बिल्डिग आहे. या बिल्डिंगमध्ये कालपासून दुर्गंधी येत होती. सदर दुर्गंधी ही एका फ्लॅटमधून येत असल्याचे लक्षात येताच आज दिनांक 29 मे रविवार रोजी सकाळी परिसरातील नागरिकांनी याची माहिती फ्लॅट मालकाला दिली. फ्लॅटमालकाने याची माहिती पोलिसांनी दिली. वणी पोलीस घटनास्थळी पोहोचले असता दरवाज्याला कुलूप आढळले. पोलिसांनी कुलूप तोडले असता आत एका तरुणीचा अर्धनग्न व कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला.
पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला. पोलिसांना घरी दोन आधार कार्ड आढळून आले. आधारकार्डवरून पोलिसांनी माहिती काढली असता सदर तरुणीचे नाव प्रिया रेवानंद बागेश्वर (25) रा. साई मंदिर जवळ वरोरा ही माहिती मिळाली. पोलिसांनी तातडीने मुलीच्या आईला घटनास्थळी बोलावले. तसेच फोरन्सिक विभागाला याची माहिती दिली. फोरेन्सिंक विभाग तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
तरुणीच्या डोक्यावर मागून डोक्यावर प्रहार असल्याचे व गळ्यावर काही खूणा असल्याचे आढळून आले. प्राथमिक तपासानुसार मृतदेहावरून तरुणीचा दोन ते तीन दिवसाआधी खून झाला व आरोपींने तरुणीचा खून करून घराचे कुलूप लावून घराबाहेर गेल्याचे निष्पन्न झाले आहे. मृतकाच्या आईकडून माहिती घेतली असता त्यांनी सदर तरुणी ही वणी येथे राहत असून ती चंद्रपूर येथील एका महाविद्यालयात शिकत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
तरुणीचा मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी वणी येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला. तरुणीचा खून का करण्यात आला? तरुणीचा खून कुणी केल्या इत्यादी गोष्टींचा तपास वणी पोलीस करीत आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.
Comments are closed.