बाई पण भारी देवाच्या यशानंतर नाच गं घुमा येतोय प्रेक्षकांच्या भेटीला

घरातील बाई आणि कामवाली बाई यांची धमाल पाहा चित्रपटगृहात

बहुगुणी डेस्क, वणी: मराठी सिनेसृष्टीत सध्या स्त्री- प्रधान चित्रपटांना प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळतोय आणि ते लोकप्रिय ठरत आहेत. ‘झिम्मा’, ‘बाईपण भारी देवा’ या स्त्री प्रधान सिनेमांनी बॉक्स ऑफिस गाजवलं. आता सगळीकडे चर्चा आहे ती सुप्रसिद्ध दिग्दर्शक परेश मोकाशी यांच्या ‘नाच गं घुमा’ या चित्रपटाची. स्वतःच करिअर सांभाळून संसार करणारी स्त्री आणि मदत करणारी कामवाली बाई यांची धम्माल गोष्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे. वणीतील सुजाता थिएटरच्या लक्झरीअस वातावरणात वणीकरांना या सिनेमाचा आनंद घेता येणार आहे. सिनेमाची ऍडव्हान्स बुकिंग सुरू असून बुक माय शो, पेटीएम मुव्ही या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तसेच 9022027550 या क्रमांकावर संपर्क साधूनही प्रेक्षकांना बुकिंग करता येणार आहे. प्रेक्षकांना ऍडवॉन्स बुकिंग करून आपल्या आवडीची सीट बुक करता येणार आहे.

काय आहे कथानक? 
‘नाच गं घुमा ही वर्किंग वूमनची गोष्ट आहे. वर्किंग वूमनला आयुष्यात एक वेगळं प्रेशर असतं. छोटं वा मोठं असो; एका महिलेचं स्वत:च असं एक स्वप्न असतं. पण, संसार, नोकरी, मुलं, घर, कर्ज या रगाड्यामध्ये त्या इतक्या अडकतात की, त्यांची छोटी स्वप्नंही मनातच राहतात. प्रत्येक गृहिणी तिच्या घराची ‘राणी’ त्याच वेळी बनू शकते जेव्हा तिची कामवाली तिच्यासाठी ‘परीराणी’ होते. कामवाली बाई आणि मालकीन या दोघांच्या नात्याचे विनोदी पद्धतीचे चित्रण या सिनेमात करण्यात आले आहे. परेश मोकाशी यांचा आत्मपॉम्फलेट हा सिनेमा प्रेक्षकांना चांगलाच गाजला होता.  

सुजाता थिएटरमध्ये करा आपल्या व्यवसायाची जाहिरात
सिनेमा थिएटर हे जाहिरातीचे एक प्रभावी माध्यम आहे. नुकतेच सुजाता थिएटरमध्ये सिनेमा सुरू होण्याच्या आधी तसेच इंटरव्हलमध्ये आपला व्यावसाय, प्रतिष्ठान याची जाहिरात करण्याची सुविधा सुरू झाली आहे. जाहिरात करण्यासाठी व अधिक माहितीसाठी 8087165057‬ या क्रमांकावर संपर्क साधावा… 

पाहिजे ती सीट करा बुक….
आपल्याला शो सुरू होण्याच्या आधी टॉकीजमध्ये जाऊन तिकीट बुक करता येईल शिवाय बुक माय शो (येथे क्लिक करा) पेटीएम वरूनही आपल्याला बुकिंग करता येते. व्हॉट्सऍपवरूनही तिकीट बुक करण्याची सुविधा उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी व बुकिंगसाठी 9022027550 या नंबरवर कॉल करून ही आपली सिट रिजर्व करता येईल. 

चित्रपटाचा खरा आनंद थिएटरमध्येच !
अनेक चित्रपटाची सध्या पायरसी होते. यात थिएटर प्रिंटचा वापर केला जातो. थिएटर प्रिंटची कॉलिटी ही अतिशय निकृष्ट असते. याशिवाय साउंड क्वॉलिटीही निकृष्ट असते. याउलट थिएटरमध्ये प्रेक्षकांना ओरीजिनल प्रिंट तसेच डॉल्बी, डिजिटल व सराउंड साऊंडसह चित्रपटाचा आनंद घेता येतो. पायरसी हा कायद्याने गुन्हा आहे शिवाय पायरेटेड कॉपी प्रेक्षकांची चित्रपट पाहण्याची गम्मत हिरावते. त्यामुळे प्रेक्षकांनी थिएटरमध्ये जाऊनच चित्रपटाचा आनंद घ्यावा असे आवाहन सुजाता थिएटरतर्फे करण्यात आले आहे.

फॅमिलिसह लुटा सिनेमाचा आनंद
सुजाता थिएटर हे आधी शाम टॉकिज नावाने शहरात सुपरिचित होते. दोन वर्षाआधी सुजाता टॉकीजचे रिनोव्हेंशन करण्यात आले. त्यामुळे टॉकीजचा चेहरामोहरा बदलून आता तिथे लक्झरी सिटिंग अरेंजमेंट करण्यात आली आहे. तसेच संपूर्ण थिएटर हे एसी आहे. बालकणी सुविधाही आहे. फॅमिलीसाठी वेगळी सिटिंग अरेंजमेंट करण्यात आली आहे. संपूर्ण थिएटरमध्ये डॉल्बी व साउंड सराउंड ही अत्याधुनिक साउंड सिस्टिम बसवण्यात आली आहे. त्यामुळे आपल्याला चित्रपटाचा खरा आनंद अनुभवायला मिळतो. त्यामुळे लवकरात लवकर तिकीट बुकिंग करून आपली सिट रिझर्व करावी असे आवाहन करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी व बुकिंगसाठी 9022027550 या नंबरवर कॉल करून ही आपली सिट रिजर्व करता येईल.

पेटीएमवरून तिकीट बुक करण्यासाठी येथे क्लिक करा…

Comments are closed.