शाळेची जुनी पुस्तकं रद्दीत विकू नका, दान करा…

गरजू व गोरगरीब विद्यार्थ्यांना दिले जाणार पुस्तकं... स्माईल फाउंडेशन व वणी बहुगुणीचा उपक्रम

बहुगुणी डेस्क, वणी: शाळा संपली, पुढच्या वर्गात विद्यार्थी गेला की त्याचे नवे घेतलेले पुस्तके पडून राहतात किंवा रद्दीत दिले जातात. मात्र ही पुस्तके गोरगरीब विद्यार्थ्यांना कामात येऊ शकतात. वर्ग 1 ते 12 वी पर्यंतची पुस्तके, नोट्स, गाईड्स तसेच (नोटबुक, कंपास, स्केचपेन, व्यवसायमाला) असे कोणतेही स्टडी मटेरिअल हे रद्दीत न विकता किंवा पडून असल्यास दान करा. हे साहित्य गोरगरीब व गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवले जाईल. हा उपक्रम स्माईल फाउंडेशन व वणी बहुगुणीतर्फे राबवण्यात येत आहे. इच्छुकांनी साहित्य देण्यासाठी किंवा अधिक माहितीसाठी प्रा. सागर जाधव (स्माईल फाउंडेशन) 7038204209 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

शाळेसाठी अनेक पालक विद्यार्थ्यांना नवीन पुस्तकं विकत घेऊन देतात. मात्र पाल्य पास झाल्यावर त्याचे पुस्तके बरेचदा घरी पडून राहतात. प्रसंगी ते रद्दीत कवडीच्या भावाने विकली जातात. मात्र यातील अनेक पुस्तके वापरण्याजोगे असतात. ही पुस्तकं गरजुंच्या शिक्षणाच्या कामात येऊ शकतात. ही पुस्तके गोळा करून गरजू आणि गोरगरीब विद्यार्थ्यांना दिले जाणार आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने जुनी पुस्तके तसेच शैक्षणिक साहित्य दान करा असे आवाहन करण्यात आले आहे.

काय करता येणार दान?
वर्ग 1 ते 12 वी पर्यंतचे स्टेट बोर्ड व सीबीएससी बोर्डचे पुस्तकं दान करता येणार आहे. याशिवाय कंपास बॉक्स, स्केचपेन, नोटबुक, व्यवसायमाला इत्यादी देखील दान करता येणार आहे. जर कुणाला नवीन साहित्य देण्याची इच्छा असेल तर त्यांना नवीन साहित्य खरेदी करून देता येणार आहे.

बुकिंगसाठी पोस्टरवर क्लिक करा...

स्माईल फाउंडेशन ही परिसरातील एक सुपरिचित सामाजिक संस्था आहे. संस्थेतर्फे नेहमी विविध सामाजिक, शैक्षणिक, पर्यावरण पुरक उपक्रम राबवले जातात. पुस्तके दान करण्याचा उपक्रम स्माईल फाउंडेशन गेल्या तीन वर्षांपासून राबवत आहे. त्यानुसार याही वर्षी हा उपक्रम राबवला जात आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क –
सागर जाधव, संस्थापक स्माईल फाउंडेशन
निकेश जिलठे, संपादक वणी बहुगुणी

Comments are closed.