दिग्रस: दिग्रस येथील संत श्री डॉ. रामराव महाराज आरोग्यधाम हॉस्पिटल ऍन्ड क्रिटिकल केअर सेंटरमध्ये शनिवार दि. ०६ जुलै रोजी मोफत अपस्मार (मिरगी/फिट) रोगनिदान व उपचार शिबिर पार पडले. या शिबिरात यवतमाळ येथील सुप्रसिद्ध मेंदूरोग, मज्जा संस्था, व चेता संस्था विकार तज्ज्ञ डॉ.हर्षल राठोड (डी. एम. न्युरोलॉजी) कन्सल्टन्ट न्युरोलॉजिस्ट, (मेंदूरोग, मज्जा संस्था व चेता संस्था विकार तज्ज्ञ) अपस्मार तज्ज्ञ ह्यांनी रुग्णांची तपासणी केली.
सदर शिबिरात सुमारे 200 रुग्णांनी तपासणी केली. आरोग्यधाम हॉस्पिटल येथे महाराष्ट्र शासनाची महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य योजना (जुनी राजीव गांधी योजना) सुरु झाली असून या योजने अंतर्गत ९७१ रोगांवर मोफत उपचार व १२१ आजारावर पाठपुरावा सेवा मोफत आहेत. सदर योजनेत पिवळे व केशरी रेशन कार्ड धारक तसेच निवडक चौदा जिल्ह्यातील सात बारा धारकांना वैद्यकीय उपचार , औषधे व शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत आहेत.
या वेळी आरोग्यधाम हॉस्पिटल चे संचालक डॉ. प्रशांत रोकडे, डॉ. शाम जाधव, डॉ. संदीप दुधे, डॉ. आशिष शेजपाल, डॉ. श्रीकृष्ण पाटील यांची उपस्थिती होती. योजनेच्या अधिक माहितीसाठी ९४२२९२२८६३, ९०२१०१४५१८ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.