जब्बार चीनी, वणी: आज गुरुवारी दिनांक 15 ऑक्टोबर रोजी तालुक्यात 3 कोरोना पॉजिटिव्ह निघालेत. यात गणेशपूर येथील 2 तर चिखलगाव येथील एका रुग्णाचा समावेश आहे. आज आलेल्या अहवालानुसार कोरोना बाधितांची एकूण संख्या 689 झाली आहे. दरम्यान आजपासून बाजारपेठ सुरू ठेवण्याचा वेळ वाढवण्यात आला असून आजपासून रात्री 9 पर्यंत बाजारपेठ आणि दुकानं सुरू ठेवण्यास जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली आहे.
आज यवतमाळहून 17 रिपोर्ट प्राप्त झाले. यात 2 व्यक्ती पॉजिटिव्ह तर 15 व्यक्ती निगेटिव्ह आल्यात. आज 20 जणांची रॅपिड ऍन्टिजन टेस्ट घेण्यात आली. यात एक पॉजिटिव्ह तर इतर संशयीत निगेटिव्ह आलेत. आज 12 संशयीतांचे स्वॅब यवतमाळ येथे पाठवण्यात आले. अद्याप 39 स्वॅबचे रिपोर्ट येणे बाकी आहे.
तालुक्यात 31 ऍक्टिव्ह पॉजिटिव्ह रुग्ण
सध्या तालुक्यात एकूण 689 पॉजिटिव्ह रुग्ण झालेत. यातील 658 व्यक्ती कोरोनावर मात करून रिकव्हर झाले आहेत. सध्या तालुक्यात 31 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. तर कोरोनाबाधितांच्या मृत्यूची एकूण संख्या 20 झाली आहे.
सध्या 8 व्यक्तींवर कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहे. तर 19 रुग्ण होम आयसोलेट आहेत. यवतमाळ येथील जीएमसी येथे 6 व्यक्तींवर उपचार सुरू आहेत. सध्या कोविड केअर सेन्टरमध्ये रुग्ण आणि संशयीत असे 8 व्यक्ती भरती आहेत. आज कोणताही रुग्ण रिकव्हर झाला नाही.
दुकानाला सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत परवानगी
आजपासून सर्व दुकानं व बाजारपेठ सुरू ठेवण्यास सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. आधी हा वेळ रात्री 7 पर्यंत होता. याशिवाय आठवडी बाजार, ग्रंथालयाला परवानगी देण्यात आली आहे. दुकान आणि बाजारपेठेला परवानगी देण्यात आली असली तरी अद्याप शाळा, कॉलेज व खासगी ट्युशनला अद्यापही परवानगी देण्यात आलेली नाही.
(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)