डॉ. श्याम जाधव (नाईक) यांची आता सांगली जिल्ह्यात आरोग्य सेवा

गेल्या चाार दिवासांपासून पूरग्रस्त भागात रुग्णांची तपासणी

0

मानोरा: कोल्हापूर जिल्ह्यानंतर डॉ. श्याम जाधव (नाईक) व त्यांची चमू आता सांगली जिल्ह्यात आरोग्य सेवा देत आहे. दोन दिवस सांगली जिल्ह्यात सेवा दिल्यानंतर ते आता सांगली जिल्ह्यातील पेठगाव वाळवा या गावी त्यांच्या चमूसोबत आरोग्य सेवा देत आहे. पेठगाव इथे लावलेल्या आरोग्य शिबिरात 987 रुग्णांवर उपचार करण्यात आला.

पूरग्रस्त नागरिकांना राष्ट्रवादी डॉक्टर सेलचे प्रदेशाध्यक्ष डॉ. नरेंद्र काळे यांच्या नेतृत्वात सध्या कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात मोफत तपासणी व औषधी वाटपाचा कार्यक्रम सुरु आहे. गेल्या चार दिवसांपासून संत श्री रामराव महाराज आरोग्यधाम हॉस्पिटलचे संचालक तथा राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी व्ही.जे.एन.टी. सेल वाशिमचे जिल्हाध्यक्ष डॉ श्याम जाधव (नाईक) हे डॉ सुनील जगताप पुणे, डॉ. अर्चना पिराबगोल, संगीता माने व संत श्री डॉ रामराव महाराज आरोग्यधाम हॉस्पिटलची चमू यांच्यासह रुग्णांची तपासणी करीत आहे.

पूरग्रस्तांना औषधी वाटप करताना

महापुरानंतर रोगराई पसरण्याचा धोका असतो डॉ. श्याम जाधव (नाईक) हे आपल्या चमूसह पूरग्रस्तांच्या उपचारासाठी रवाना झाले आहे. परिस्थिती पूर्ववत येईपर्यंत पूरग्रस्त भागात आरोग्य सेवा पुरवली जाणार आहे अशी माहिती त्यांनी दिली आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.