अल्पवयीन मुलगी बेपत्ता; फूस लावून पळवल्याचा संशय
शौचास गेल्यानंतर मुलगी बेपत्ता; पोलिसांत गुन्हा
बहुगुणी डेस्क, वणी: मारेगाव तालुक्यात 16 वर्षीय अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याची घटना समोर आली असून या प्रकरणी मारेगाव पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत फिर्यादी वडील (वय 50, रा. वेगाव) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांची मुलगी (वय 16 वर्षे 10 महिने) ही 17 एप्रिल रोजी दुपारी सुमारे 12:30 वाजता शौचास जाण्यासाठी घराबाहेर गेली होती. मात्र बराच वेळ उलटूनही ती परत न आल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली.
नातेवाईक तसेच परिसरातील गावांमध्ये शोध घेऊनही मुलगी न सापडल्याने अखेर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. फिर्यादीने आपल्या तक्रारीत अज्ञात व्यक्तीने फूस लावून मुलीचे अपहरण केल्याचा संशय व्यक्त केला आहे.
या प्रकरणी भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत कलम 137(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रवीण सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.



Comments are closed.