वणी विधानसभेत एका वर्षात 200 कोटींचे विकास कामे !

जितेंद्र कोठारी, वणी: महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंदावलेली विकासाची गाडी एकदा पुन्हा सुसाट वेगाने धावू लागली आहे, राज्यात युती सरकारच्या स्थापनेनंतर वणी विधानसभा मतदार संघात रस्ते व इतर विकास कामासाठी तब्बल 200 कोटी रुपयांचा निधी आणला, वणी मतदारसंघाच्या इतिहासात पहिल्यादांच एवढा निधी मिळाल्याचा दावा आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी पत्रकार परिषदेत केला. रविवार 12 मार्च रोजी विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्यांनी वणी विधानसभा क्षेत्रात झालेल्या व होणा-या कामाबाबत माहिती दिली.

एका वर्षात 200 कोटींचा निधी मिळाला असून पुढील वर्षी हायब्रिड एन्यूटी मॉडेल (HEM) अंतर्गत किमान 900 कोटीचे रस्त्यांचे कामे मतदार संघात होणार, यात राज्य महामार्गाच्या विकासासाठी 47 कोटी रुपये, जिल्हा अंतर्गत रस्त्यांसाठी 4.10 कोटी रुपये, ग्रामीण रास्ते विकासासाठी 24.60 कोटी, सामाजिक न्याय विभागांतर्गत ग्रामीण दलित वस्ती विकासासाठी 4 कोटी, पंचवीस पंधरा योजने अंतर्गत ग्रामीण भागासाठी 5 कोटीची निधी मिळाला आहे, अशी माहिती आमदार बोदकुरवार यांनी दिली.

तालुक्यातील भांदेवाडा येथील श्री जगन्नाथ बाबा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 2 कोटी, जैताई देवस्थानसाठी 1 कोटी, रंगनाथ स्वामी देवस्थानसाठी 1 कोटी आणि गोडगाव (देवी) येथील प्रख्यात भवानी माता मंदिरासाठी 1 कोटी रुपये नुकतेच शासनाकडून मंजूर करण्यात आले आहे. वणी शहरात साई मंदिर ते वरोरा रोड रेल्वे क्रॉसिंग पर्यन्त सीमेंट रोड, जटाशंकर चौक ते निर्गुडा नदी, भारतमाता चौक ते निर्गुडा नदी पर्यन्त सीमेंट रस्त्याचे कामे सुरू आहे. तसेच शिवाजी चौक ते दीपक चौपाटी व तुटी कमान ते काठेड ऑइल मिल पर्यन्त 10 कोटीच्या सीमेंट रस्त्याचे टेंडर झाले असून लवकरच काम होणार आहे.

ग्रामीण भागात वणी- ढाकोरी रस्ता, मोहदा- टुंड्रा रस्ता, खैरी- वडकी कडे जाणारा रस्ता, पाटण- झरी, माथार्जुन- सुर्दापुर, झरी- पाटण, अडेगाव- खातेरा, गणेशपूर-कोसारा, मारेगाव- मार्डी या रस्त्यासाठी 80 कोटी रुपये निधीची कामे प्रत्यक्षात सुरू झाली आहेत. घोन्सा- शिबला मार्गाने केळापुर- पारवा कडे जाणारा मार्ग, वणी- नांदेपेरा-मार्डी- खैरी वडकी कडे जाणारा मार्ग, चारगावं- शिंदोला पासून चंद्रपूरच्या सीमेपर्यंतचा रोड, रासा- बोर्डा करणवाडी- कुंभा खैरी पर्यन्तच्या प्रस्तावित रस्त्याच्या कामाच्या सर्वेक्षणासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. या मार्गासाठी फार मोठया प्रमाणात निधी उपलब्ध होणार आहे. अशी माहिती या विधानसभा क्षेत्राचे विकास पुरुष आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार दिली.

निधी मिळाला असला तरी यातील काही कामे कंत्राटदारांच्या अडचणीमुळे थांबले असल्याचेही त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेत विजय पिदुरकर, तारेंद्र बोर्ड, दिनकर पावड़े, संजय पिंपळशेडे, गजानन विधाते, श्रीकांत पोटदुखे यांच्यासह पत्रकारांची हजेरी होती.

Comments are closed.