आज शहरात कोरोनाचे 5 रुग्ण, रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ

57 व्यक्तींवर लॉकडाऊनचे नियम तोडल्याने कारवाई

0

जब्बार चीनी, वणी: आज गुरूवारी दिनांक 25 फेब्रुवारी रोजी कोरोनाचे 5 रुग्ण आढळून आलेत. यातील 4 रुग्ण हे जिल्हा परिषद कॉलोनी तर 1 रुग्ण प्रगतीनगर येथील आहे. सध्या तालुक्यात कोरोनाचे ऍक्टिव्ह रुग्ण 30 आहेत. दरम्यान कोरनाचा वाढू नये यासाठी प्रशासनाची लॉकडाऊनचे नियम तोडणा-यांवर कार्यवाही आजही सुरूच होती. आज तब्बल 57 व्यक्तींवर मास्क न वापरणे व सोशल डिस्टन्सिंग न ठेवल्याने दंड आकारण्यात आला आहे.

आज 33 संशयीतांच्या रॅपिड ऍन्टिजन टेस्ट करण्यात आल्या. यात 5 व्यक्ती पॉजिटिव्ह तर 28 व्यक्ती निगेटिव्ह आल्यात. आजच्या रुग्णसंख्येमुळे तालुक्यात कोरोनाचे ऍक्टिव्ह रुग्ण 30 झाले आहेत. यातील 10 रुग्ण होम आयसोलेट आहेत. 7 रुग्ण कोविड केअर सेंटरला उपचार घेत आहेत. तर 13 रुग्णांवर यवतमाळ व इतर ठिकाणी उपचार सुरू आहे.

आज आलेल्या रुग्णांवरून 22 संशयीतांचे स्वॅब यवतमाळ येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले. आज एकही अहवाल प्राप्त झालेला नाही. आतापर्यंत तालुक्यात कोरोनाचे एकूण 1228 रुग्ण आढळून आलेत. यातील 1173 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर 25 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

आज 57 व्यक्तींवर कारवाई
लॉकडाऊनचे नियम तोडणा-यांवर कारवाईचा सपाटा सुरूच आहे. आज 57 व्यक्तींवर कारवाई करण्यात आली आहे. यातील 7 व्यक्तींवर मास्क न वापरल्याने तर 49 व्यक्तींवर सोशल डिस्टन्सिंग न पाळल्याने कारवाई करण्यात आली. यात मास्क न लावणा-यांना प्रत्येकी 500 रुपये तर असा 3500 हजार रुपये तर सोशल डिस्टन्सिंग न पाळणा-यांकडून प्रत्येकी 200 रुपये असा 9800 रुपये असा एकूण 13300 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

हे देखील वाचा:

लॉकडाऊनमुळे स्पर्धा परीक्षेची तयारी सोडून घरी आला आणि सरपंच झाला

 

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.