वणी तालुक्यात आतापर्यंत 56 टक्के नागरिकांनी घेतली कोविड लस

सर्वात जास्त 68 टक्के लसीकरण कोलगाव आरोग्य केंद्रात

जितेंद्र कोठारी, वणी: कोरोना पासून बचाव करण्यासाठी संपूर्ण देशात कोविड व्हॅक्सीन लसीकरण मोहीम सुरु आहे. वणी तालुक्यातही शहरी व ग्रामीण भागात कोविड लसीकरण जोमाने सुरु आहे. वणी तालुक्यात 22 सप्टेंबर पर्यंत ग्रामीण व शहरी भागातील तब्बल 56 टक्के नागरिकांनी कोविड लस घेतल्याची माहिती तालुका आरोग्य विभागाने दिली आहे. त्यात सर्वात जास्त कोलगाव प्राथमिक उपकेंद्र अंतर्गत 68 टक्का तर सर्वात कमी राजूर उपकेंद्रमध्ये 47 टक्का नागरिकांचे लसीकरण झाले आहे.

वणी तालुक्यात वणी ग्रामीण रुग्णालय व राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान (कल्याण मंडपम) सह कायर, शिरपूर, कोलगाव आणि राजूर प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रावर लसीकरण मोहीम सुरु आहे. लसीकरण मोहीम अंतर्गत दि. 22 सप्टेंबर पर्यंत ग्रामीण रुग्णालय केंद्रात 32304 व कल्याण मंडपम केंद्रात 2674 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. यात आरोग्य सेवक, फ्रंट लाईन वर्कर, 18 ते 44 वर्ष, 45 ते 60 वर्ष आणि 60 वर्षापुढील महिला, पुरुष, युवक, युवतींना कोव्हीशील्ड आणि कॉव्हॅक्सीन लस देण्यात आली.

ग्रामीण भागात शिरपूर प्राथ. आरोग्य केंद्र अंतर्गत व त्या अधिनस्थ उपकेंद्रावर 20537 (56.34%), कोलगाव प्राथ. आरोग्य केंद्र अंतर्गत 17380 (68.00%), कायर प्राथ. आरोग्य केंद्र अंतर्गत 20360 (55.03%) व राजूर प्राथ. आरोग्य केंद्र अंतर्गत 21069 (47.44%) नागरिकांनी कोविड लसीकरचे लाभ घेतले. वणी तालुक्यात ग्रामीण भागातील 143416 व शहरी भागात 58840 असे एकूण 202256 लोकसंख्या आहे. त्यातून 22 सप्टेंबर पर्यंत 114324 नागरिकांचे लसीकरण उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले.

कोविड लसीकरण मोहीम वेगाने राबविण्याकरीता ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर सर्व आरोग्य अधिकारी, कनिष्ठ चिकित्सक, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका व आरोग्य कर्मचारी आपल्या जीवाची पर्वा न करता अहोरात्र मेहनत घेत आहे. आरोग्य विभागाच्या सर्व कोविड योद्दाना ‘वणी बहुगुणी’ तर्फे सॅल्युट.

हे देखील वाचा:

‘युग’च्या मदतीला सरसावली माणुसकी; मदतीचा ओघ सुरू

Comments are closed.